शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

दिव्यांगांच्या दाखल्यांचा आॅनलाईन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:13 AM

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्राच्या नव्या कायद्यानुसार देशभरातील सर्व दिव्यांगांना एकच ओळखपत्र मिळणार आहे. सर्व ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्राच्या नव्या कायद्यानुसार देशभरातील सर्व दिव्यांगांना एकच ओळखपत्र मिळणार आहे. सर्व प्रकारच्या योजनांचे लाभ या एकाच ओळखपत्राच्या माध्यमातून देण्याचे सरकारचे धोरण आहे. ते काढण्याची प्रक्रिया पाहिली तर ‘भीक नको पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ दिव्यांगांवर आली आहे.पूर्वीप्रमाणे दिव्यांग दाखले देण्याची प्रक्रिया शासनाने २ आॅक्टोबरपासून बंद केली आहे. आता नव्या कायद्यानुसार दिव्यांगांना वैश्विक ओळख दर्शविणारे ‘यूडीआयडी’ हे ओळखपत्र दिले जाणार आहे. दिव्यांगांना हे फारच सोईचे असले तरी हे ओळखपत्र काढण्यासाठी यंत्रणा राबविण्यात मात्र शासनाची उदासीनता दिसत आहे. सर्व भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर टाकला आहे. यावरून तक्रारी झाल्यानंतर जिल्ह्यात सहा केंद्रांना नव्याने मंजुरी मिळाली आहे; तथापि त्यांची अद्याप अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत एकही ओळखपत्र तयार होऊ शकलेले नाही.हे ओळखपत्र काढण्यासाठी आधी तहसीलदारांमार्फत उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा लागतो. हा दाखला मिळाल्यानंतर दिव्यांगत्वाच्या दाखल्यासाठी आॅनलाईन अर्ज केला जातो. त्यासाठी संबंधित दिव्यांगाला ई-सेवा केंद्रात अथवा जवळच्याच नेट कॅफेमध्ये जावे लागते. तेथे सर्व माहितीसह फॉर्म भरल्यानंतर पावती घेऊन ती सीपीआर रुग्णालयामध्ये येऊन सादर करावी लागते. ही पावती सादर झाल्यानंतर ‘सीपीआर’मध्ये संबंधित दिव्यांगाची शारीरिक व कागदपत्रांची तपासणी होऊन डॉक्टरांमार्फत दाखला तयार केला जातो. तपासणी व प्रत्यक्षात सही करण्यापर्यंत फॉर्म भरण्यासाठी एका रुग्णामागे २० मिनिटांचा अवधी लागतो. दिव्यांगांची संख्या, डॉक्टरांची अपुरी संख्या पाहिल्यावर ही प्रक्रिया वेग घेईनाशी झाली आहे.नवीन वर्षातच ओळखपत्रदाखल्यानंतर ओळखपत्र तयार करण्यासाठी दिव्यांगाची डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असते. त्यासाठीही दिव्यांगांना संंबंधित केंद्रावर बऱ्याच येरझाºया माराव्या लागत असून, सर्व्हर डाऊन होण्याच्याही त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही ओळखपत्रे नवीन वर्षात मिळतील असे सांगण्यात येत आहे.डाटा एंट्रीआॅपरेटर नाहीतरुग्णांनी भरलेली माहिती, तिची पडताळणी व प्रत्यक्षात डॉक्टरांची सही होईपर्यंतही सर्व माहिती एकत्रित संकलित करण्यासाठी डाटा एंट्री आॅपरेटर भरण्याची गरज होती. पण शासनाने ही पदेच भरलेली नसल्यामुळे तपासणीबरोबरच संबंधित दिव्यांगाची माहितीही सॉफ्टवेअरमध्ये भरण्याचे काम डॉक्टरांनाच करावे लागत आहे.महानगरपालिकेला माहितीच नाहीमहानगरपालिका कार्यक्षेत्रात दिव्यांगांना दाखले देण्यासाठी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटल या महानगरपालिकेच्या रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. तथापि या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोणतीही माहिती नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिव्यांगांचे सर्वेक्षण होउन दाखला देण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी महापालिका प्रशासन अजूनही अनभिज्ञच आहे.दाखले मिळण्याची ठिकाणेआजरा, चंदगड व गडहिंग्लजसाठी : ग्रामीण रुग्णालय, कागल. करवीरसाठी : सेवा रुग्णालय, कसबा बावडा. शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावड्यासाठी : वारणा-कोडोली. राधानगरी, भुदरगडसाठी : गारगोटी उपरुग्णालय, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजीसाठी : आयजीएम रुग्णालय.