कोल्हापूर : भाजीपाला, फळे आॅनलाईन किंवा फोन करून, व्हॉटस् अॅपवरून मागणी नोंदवल्यास घरपोच सेवा देण्याची व्यवस्था आता कोल्हापुरात निर्माण झाली आहे. भाजीपाला व्यवसायिक राहुल चौगुले (रा. गांधीनगर, कोल्हापूर) व फळ विक्रेते इरफान बिजली (रा. यादवनगर, कोल्हापूर) यांनी १५ मार्चपासून ही सेवा सुरू केली आहे. बाजारभावाप्रमाणे घरबसल्याच भाजीपाला, फळे मिळत असल्याने मंडईत जाण्या-येण्याचा खर्च वाचत आहे. सरासरी सध्या शहरातील १०० ग्राहकांना रोज मागणीप्रमाणे पुरवठा केला जात आहे. आॅनलाईन खरेदी केल्यानंतर वस्तू स्वस्त मिळतात. याशिवाय दुकान शोधण्याचा वेळ व जाण्या-येण्याचा खर्च वाचतो. त्यामुळे दिवसेंदिवस आॅनलाईन वस्तू खरेदी (शॉपिंग) करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. परवडेल अशा किमतीमध्ये स्मार्ट मोबाईल संच मिळत आहे. त्यामुळे शहर व खेड्यातील मध्यमवर्गीयांकडेही हा मोबाईल आहे. इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे व्हॉटस् अॅप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचा वापर वाढतो आहे म्हणूनच आॅनलाईन मागणी नोंदवलेल्यांना घरपोच पुरवठा करण्याची सेवा देण्यास या दोन व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे.एक ते पुढे कितीही किलोपर्यंत आॅर्डर दिली तरी पोहोच केली जात आहे. दुपारी एकपर्यंत आॅर्डर दिल्यानंतर सायंकाळी चारनंतर, तर दुपानंतर आॅर्डर दिल्यास दुसऱ्यादिवशी पोहोच केली जाते. पोहोच झाल्यानंतर पैसे देण्याची व्यवस्था आहे. नागाळा पार्क, ताराबाई पार्क, राजारामपुरी, रूईकर कॉलनी, रमणमळा, शाहूपुरी, न्यू पॅलेस या परिसरातून आॅनलाईन मागणी अधिक आहे.भविष्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माल खरेदी करणे आणि ग्राहकांना पुरवठा करणे अशी व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन आहे. ही व्यवस्था कार्यान्वित झाल्यास ग्राहकांना बाजारपेठेपेक्षा कमी भावाने घरपोच भाजी, फळे देणे शक्य होणार आहे. आता मागणीप्रमाणे मंडईत जाऊन चांगल्या दर्जाची भाजीपाला, फळे, कांदे, बटाटा खरेदी केली जाते. त्यानंतर ग्राहकांना पोहोच केले जाते. - राहुल चौगुले, कोल्हापूरआॅनलाईन बुकिंगमुळे घरपोच भाजीपाला, कांदा मिळतो. त्यामुळे जाण्या-येण्याचा खर्च वाचतो. तीन, चारवेळा आॅर्डर दिली होती. सेवाही चांगली वाटली.- संजया माने, गृहिणी, ताराबाई पार्क,
भाजीपाला खरेदीही आॅनलाईन
By admin | Published: March 28, 2016 12:42 AM