येथील ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमाविषयी ऑनलाईन कार्यशाळा पार पडली.
छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल वावरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण होते.
वावरे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संशोधन आराखडा समजावून सांगितला पाहिजे. संशोधन समस्या हा संशोधनातील महत्त्वाचा घटक आहे. संशोधन विषय रक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. ऋतुजा बांदिवडेकर यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. पी. एस. कांबळे यांनी, तर द्वितीय सत्रात डॉ. ए. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतून ११४ प्राध्यापक व संशोधक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. समीर कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी यांनी तंत्रसाहाय्य केले.
काशिनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानराजा चिघळीकर यांनी अतिथी परिचय करून दिला. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शर्मिला घाटगे यांनी आभार मानले.