शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
2
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
3
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
4
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
5
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
6
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
7
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
8
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
9
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
10
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
11
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
12
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
13
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
15
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
16
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
17
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
18
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
19
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
20
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात

लाडकी बहीणसाठी झुंबड, पिंक रिक्षांसाठी केवळ 'इतक्या' महिला इच्छुक; कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांना मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 4:22 PM

अर्जासाठी महिला व बालकल्याणचे आवाहन

कोल्हापूर : काहीही कष्ट न करता दर महिन्याला खात्यावर १५०० रुपये मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांच्या उड्या पडत असताना दुसरीकडे त्यांना कायमचा रोजगार देणाऱ्या पिंक ई रिक्षांना जिल्ह्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी ६०० रिक्षा मंजूर असताना आतापर्यंत फक्त २५ महिलांनी त्यासाठी अर्ज केला आहे. योजनेच्या लाभासाठी महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज करावे, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून केले जात आहे.राज्यातील महिला व मुलींसाठी रोजगार निर्मिती, त्यांचे आर्थिक स्वावलंबन, सामाजिक पुनर्वसन व्हावे म्हणजे महिला व मुलींना सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी राज्य शासनाने जुलै महिन्यात पिंक ई रिक्षा योजना सुरू केली. त्याला जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. याेजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात फक्त २५ महिलांनी त्यासाठी अर्ज केला आहे. प्रतिसाद वाढावा यासाठी शासनाने निर्णयात दुरुस्ती करून कागदपत्रांसाठीच्या अटी शिथिल केल्या आहेत.

निर्णयात दुरुस्तीमहाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र यासाठी जन्मदाखला, महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. कुटुंब प्रमुखाचा तीन लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला यासाठी पिवळे रेशनकार्ड, केशरी रेशनकार्ड यापैकी एक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महिला व मुलींना सुरक्षित प्रवासग्रामीण भागात महिला व मुलींना प्रवासासाठी फार कमी सोयी-सुविधा आहेत. तासन तास एसटी बसेसची वाट पाहणे किंवा वडापसारख्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अनेक मुलींना सुरक्षित प्रवासाची साधने नसल्याने शालेय-महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. पिंक ई रिक्षा त्यांच्या प्रवासासाठी सुरक्षित असणार आहे.

मानसिकता बदलण्याची गरजरिक्षा फक्त पुरुषच चालवतात, आपण कशी चालवायची अशी महिलांची मानसिकता असते, पण अनेक मोठ्या शहरांमध्ये महिला रिक्षा चालवत आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत. त्यामुळे महिलांनी व कुटुंबीयांनीदेखील मानसिकता बदलणे गरजेचे आहे. दुसरीकडे शासनाकडूनदेखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झालेला नाही.

महिलांच्या कायमस्वरूपी आर्थिक स्वावलंबनासाठी, सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजना अत्यंत उपयुक्त आहे. जिल्ह्यासाठी ६०० ई रिक्षा मंजूर असून, लाभासाठी महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज करावे. - सुहास वाईंगडे, महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला