गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या एकूण ४४२ जागांसाठी दाखल १६७२ अर्जांपैकी छानणीत केवळ ८ अर्ज अवैध ठरले. छानणीअंती १६६४ अर्ज वैध ठरले आहेत. येथील म. दुं. श्रेष्ठी विद्यालयात छानणी प्रक्रिया पार पडली.निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार दिनेश पारगे यांच्या उपस्थितीत छानणी प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुतेक गावातील उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जाबद्दल हरकती घेणे टाळले.जात पडताळणी प्रमाणपत्राची पोहोच नसणे, उमेदवाराचे वय कमी असणे आणि अपुरी कागदपत्रे या कारणामुळे ८ अर्ज अवैध ठरविण्यात आले. अवैध अर्जांची गावनिहाय संख्या अशी - हनिमनाळ २, बुगडीकट्टी, खणदाळ, नौकूड, हरळी बुद्रूक, बसर्गे व हसूरचंपू (प्रत्येकी १)वैध अर्जांची संख्या गावनिहाय अशी : चन्नेकुप्पी ३६, तुप्पूरवाडी १२, मुंगूरवाडी २९, हनिमनाळ ४७, चिंचेवाडी २४, खणदाळ ४२, चंदनकुड १०, तेरणी ६०, जरळी २७, नंदनवाड ३१, मांगनूर तर्फ सावतवाडी १८, दुगूनवाडी ७, शेंद्री २८, शिंदेवाडी १६, तेगिनहाळ ७, हेब्बाळ जलद्याळ २७, अरळगुंड २४, जांभूळवाडी २१, सावतवाडी तर्फ नेसरी ८, बुगडीकट्टी ३३, तळेवाडी १४, वाघराळी ३२, लिंगनूर तर्फ नेसरी २२कानडेवाडी १५, नौकुड २१, मनवाड २७, हरळी बुद्रक ३७, मुत्नाळ ३६, इंचनाळ ६५, उंबरवाडी ३३, गिजवणे ७८, ऐनापूर ५८, हलकर्णी ७४, लिंगनूर काानूल २५, औरनाळ ६२, शिप्पूर तर्फ आजरा २०, बसर्गे ५१, निलजी २६, हुनगिनहाळ २६, नरेवाडी ३०, हेब्बाळ काानूल ५६, वडरगे २०, नूल ७१, इदरगुच्ची १५, बेळगुंदी १८, हिरलगे २९, मासेवाडी २३, माद्याळ ५१, दुंडगे ६४, हसूरचंपू ५८. एकूण १६६४
गडहिंग्लज तालुक्यात केवळ ८ अर्ज अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 6:56 PM
gram panchayat Election Kolhapur- गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या एकूण ४४२ जागांसाठी दाखल १६७२ अर्जांपैकी छानणीत केवळ ८ अर्ज अवैध ठरले. छानणीअंती १६६४ अर्ज वैध ठरले आहेत. येथील म. दुं. श्रेष्ठी विद्यालयात छानणी प्रक्रिया पार पडली.
ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यात केवळ ८ अर्ज अवैध५० ग्रामपंचायतींच्या एकूण ४४२ जागांसाठी दाखल १६६४ अर्ज