गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या एकूण ४४२ जागांसाठी दाखल १,६७२ अर्जांपैकी छाननीत केवळ ८ अर्ज अवैध ठरले. यावेळी छाननीअंती १,६६४ अर्ज वैध ठरले असून, येथील म. दुं. श्रेष्ठी विद्यालयात ही छाननी प्रक्रिया पार पडली.
निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार दिनेश पारगे यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. बहुतेक गावातील उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जाबद्दल हरकती घेणे टाळले. जात पडताळणी प्रमाणपत्राची पोहोच नसणे, उमेदवाराचे वय कमी असणे आणि अपुरी कागदपत्रे या कारणांमुळे ८ अर्ज अवैध ठरविण्यात आले. अवैध अर्जांची गावनिहाय संख्या अशी - हनिमनाळ २, बुगडीकट्टी, खणदाळ, नौकूड, हरळी बुद्रुक, बसर्गे व हसूरचंपू (प्रत्येकी १)
वैध अर्जांची संख्या गावनिहाय अशी : चन्नेकुप्पी ३६, तुप्पूरवाडी १२, मुंगूरवाडी २९, हनिमनाळ ४७, चिंचेवाडी २४, खणदाळ ४२, चंदनकुड १०, तेरणी ६०, जरळी २७, नंदनवाड ३१, मांगनूर तर्फ सावतवाडी १८, दुगूनवाडी ७, शेंद्री २८, शिंदेवाडी १६, तेगिनहाळ ७, हेब्बाळ जलद्याळ २७, अरळगुंड २४, जांभूळवाडी २१, सावतवाडी तर्फ नेसरी ८, बुगडीकट्टी ३३, तळेवाडी १४, वाघराळी ३२, लिंगनूर तर्फ नेसरी २२ कानडेवाडी १५, नौकुड २१, मनवाड २७, हरळी बुद्रक ३७, मुत्नाळ ३६, इंचनाळ ६५, उंबरवाडी ३३, गिजवणे ७८, ऐनापूर ५८, हलकर्णी ७४, लिंगनूर कानूल २५, औरनाळ ६२, शिप्पूर तर्फ आजरा २०, बसर्गे ५१, निलजी २६, हुनगिनहाळ २६, नरेवाडी ३०, हेब्बाळ कानूल ५६, वडरगे २०, नूल ७१, इदरगुच्ची १५, बेळगुंदी १८, हिरलगे २९, मासेवाडी २३, माद्याळ ५१, दुंडगे ६४, हसूरचंपू ५८. एकूण १,६६४