कोपार्डे : छत्रपती शाहू महाराजांनी शेतीला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचा व पर्यायाने खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल यादृष्टीने दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची उभारणी केली. या थोर राजाचा आदर्श समोर ठेवून नद्याजोड प्रकल्पाला गती दिल्यास भारत जगात सहज महासत्ता बनेल, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. वाकरे (ता. करवीर) येथे ज्ञानू रामा पाटील सहकार समूहाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके होते. डॉ. पाटील म्हणाले, सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांचे हीत जोपासणे महत्त्वाचे आहे. जर शेतीला पाणी मिळाले तरच देशातील शेतकरी आपल्या कष्टाने शेती फुलवेल. यासाठी नद्याजोड प्रकल्पाला महत्त्व देणे फार महत्त्वाचे आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, सहकारी संस्था व साखर कारखाने यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला. राज्यात अडीच लाख सहकारी संस्थांमधील किमान ५० टक्के संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अरुण नरके, प्रदीप मालगावे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, जिल्हा परिषदेचे विलास पाटील, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्या छाया माने, जयंत आसगावकर, कुंभीचे उपाध्यक्ष शामराव गोधडे, सरपंच लता माने, कुंभीचे संचालक भगवान पाटील, आनंदराव पाटील, जयसिंग पाटील, शंकर पाटील, सुभाष पाटील, भरत खाडे, किशोर पाटील, यल्लाप्पा कांबळे, पांडुरंग दाभोळकर, संजय पाटील उपस्थित होते. ‘ज्ञानू’स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. डी. वाय. पाटील, आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आले. समूहाचे नेते अनिल पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देश महासत्ता
By admin | Published: October 27, 2015 10:07 PM