कोल्हापूर : शहरात रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. या अभियानामध्ये स्वरा फौंडेशन, वृक्षप्रेमी संस्था या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला. मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहता ती एक औपचारिकताच राहिली आहे.
शहरातील नेहरूनगर, काशीद कॉलनी सम्राटनगर, के. एम. टी. वर्कशॉप शास्त्रीनगर, सर्किट हाऊस ते लाईन बाजार, तलवार चौक ते संभाजीनगर मेन रोड येथे स्वच्छता करण्यात आली. स्वरा फौंडेशनच्या वतीने जयंती पंपिंग स्टेशन परिसराची स्वच्छता करून झाडांना पाणी घालण्यात आले. यावेळी शाखा अभियंता आर. के. पाटील, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, उपाध्यक्ष अमृता वासकर, डॉ. अविनाश शिंदे, आयुष शिंदे, आदी उपस्थित होते.
वृक्षप्रेमी संस्थेमार्फत पंचगंगा नदी परिसर, शाहू रोड, दसरा चौक, टाकाळा परिसर उद्यानामध्ये प्लास्टिक कचरा उठाव करून स्वच्छता मोहीम करण्यात आली. मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, सचिन पवार, संदीप देसाई, परितोष उरकुडे, तात्या गोवावाला, प्रमोद गुरव, विकास कोंडेकर यांनी भाग घेतला.