कोल्हापूर : मराठी चित्रपट कोणत्याही प्रायोजकत्व, अनुदानाच्या कुबड्यांशिवाय बॉक्स आॅफिसवर हिट होईल, तेव्हाच खºया अर्थाने मराठी चित्रपट समृद्ध होईल, असे मत प्रसिद्ध नाट्यलेखक, दिग्दर्शक व कलाकार अभिराम भडकमकर यांनी रविवारी व्यक्त केले. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गायन समाज देवल क्लबतर्फे सत्कार व प्रकट मुलाखत आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.भडकमकर म्हणाले, टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये आशय मोठा झालेला नाही. हे केवळ टाइमपासचे माध्यम झाले आहे. यात कलाकारांना शिफ्टमधून यांत्रिकपणा आणला आहे. कलाकारांनीही त्या-त्या माध्यमांची ताकद, मर्यादा ओळखून काम करावे. आशयाच्या दृष्टीने मराठी सिनेमा समृद्ध झाला आहे. मात्र, अर्थकारण, वितरणात समृद्ध होणे गरजेचे आहे. मी कोल्हापूरच्या वि. स. खांडेकर प्रशालेत चौथीत प्रवेश घेतला नसता तर कदाचित या क्षेत्रातही आलो नसतो. या शाळेने पैलवान, खेळाडू, कलाकार, साहित्यिक घडविले आहेत. यावेळी कोल्हापूरबद्दलच्या अनेक आठवणी व कलाकार ते साहित्यिक व्हाया दिग्दर्शक असा प्रवासही त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. देवल क्लबचे कार्यवाह अरुण डोंगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. डॉ. आशितोष देशपांडे यांनी प्रास्ताविक व रसिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यासागर अध्यापक यांनी प्रकट मुलाखत घेतली.आॅगस्टअखेर नवीन कादंबरीनॅशनल स्कूल आॅफ ड्रामाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा’ हा ड्रीम प्रोजेक्ट येत्या दोन वर्षांत साकारणार आहे. यामधून राज्यभरातून अनेक कलाकार घडतील.नाटक, चित्रपट, मालिकांबरोबरच आॅगस्टअखेर कोल्हापूर आणि टाकाळा या परिसराचा उलगडा करणारी नवी कादंबरी प्रकाशित होईल.
...तरच मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:11 AM