कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : घाटकरवाडी (ता. आजरा) येथे वनविभागाने घोषित केलेला हत्ती कॅम्प हा कर्नाटकातील कॅम्पच्या धर्तीवर असून, या कॅम्पमध्ये केवळ दोनच हत्ती राहणार आहेत.घाटकरवाडी हत्ती कॅम्प उभा करणार असल्याची घोषणा वनविभागाने केल्याने आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अनेक गैरसमज जनतेमध्ये निर्माण झाले आहेत. कॅम्पची स्पष्टता नसल्याने शेतकºयांमधून विरोधाची भावना तयार झाली आहे.हा कॅम्प १० ते १५ हेक्टरमध्ये होणार आहे. कॅम्पसाठी केवळ वनविभागाची जमीन वापरण्यात येणार आहे. कोणत्याही शेतकºयाची जमीन घेणार नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. घाटकरवाडीच्या धरणात पाणी मुबलक असल्याने ही जागा निवडण्यात आली आहे.हत्तीसाठी माहुत तयार करण्यात येणार आहे. हत्तीच्या पायात साखळी बांधून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर त्याला चांदोली अभयारण्यात किंवा कर्नाटकात सोडण्यात येणार आहे. बंगलोर, म्हैसूर, धारवाड, आदी ठिकाणी हत्तींसाठी छोटे कॅम्प उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर घाटकरवाडीचा कॅम्प असणार आहे. या कॅम्पमध्ये १५ ते २० हत्ती राहणार नसून, केवळ दोनच हत्ती राहतील. एवढ्यापुरता मर्यादित कॅम्प राहणार आहे. हे हत्ती आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा या तालुक्यांत रमल्याने हलविण्यात आल्यास हत्ती बिथरू शकतात. त्यामुळे हत्ती ज्या भागात रमला त्या भागातच कॅम्प करणे आवश्यक असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.हत्ती पार्कसाठी तिलारी योग्यचंदगड तालुक्यातील तिलारी जंगलात मुबलक पाणीसाठा, चारा व विस्तृत जंगल असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटकातून येणारे हत्ती तिलारीच्या हत्ती पार्कमध्ये राहू शकतात. महाराष्ट्रात येणारा हत्ती कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे हत्ती पार्कसाठी तिलारीचा जंगल योग्य असल्याचे सामाजिक व वनविभागातील तज्ज्ञांचे मत आहे.
या हत्तींचा मानवी वस्तीला कोणताही धोका नसून, हत्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कॅम्पमध्ये दोनहून अधिक हत्ती नसल्याने शेतकºयांची जमीन घेण्याचा संबंधच येत नाही. भविष्यात तिलारीच्या जंगलात मोठा पार्क होणार असल्याने जिल्ह्यातील येणारे सगळे हत्ती तिलारीमध्ये सोडण्यात येणार आहेत.- सुनील लाड, वनक्षेत्रपाल आजरा