कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील छत्रपती शाहू टर्मिनन्स रेल्वे स्थानकातून बंद झालेल्या १५पैकी दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यामुळे नियमित पुणे, मुंबई, मिरज असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ मार्च २०२० रोजी बंद झालेल्या १५ रेल्वे गाड्यांपैकी केवळ महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत.
- निजामुद्दीन, अहमदाबाद एक्सप्रेस, दीक्षाभूमी एक्सप्रेस, सोलापूर एक्सप्रेस, नागपूर, हैदराबाद , सह्याद्री , महालक्ष्मी, हरिप्रिया, राणी चैन्नम्मा , मिरज, सातारा, पुणे पॅसेंजर अशा प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या रेल्वे गाड्या अजूनही सुरु झालेल्या नाहीत.
- दहा हजारांहून अधिक प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाला ‘ब्रेक’
- दुहेरीकरणाच्या कामालाही ‘ब्रेक’
- लाॅकडाऊनच्या काळात कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना परराज्यात पोहाेचविण्यासाठी श्रमिक रेल्वे चारवेळा सोडण्यात आली.