प्रतिक्रिया...
मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून एकही उद्यान नाही, ही वस्तुस्थिती आहे. शाहू उद्यान खुले केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होऊ शकते. मुख्य मार्गावर असणारे हे उद्यान बंद असणे, हे शोभनीय नाही. हे उद्यान खुले करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून, तेथील सुविधांसाठी फंड उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन नियोजन
मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.
शेती उत्पन्न बाजार समितीमधील शाहू उद्यान गेली कित्येक वर्षे नागरिकांच्या वापराविना बंद आहे. मात्र सध्या कोरोनाचे संकट गंभीर असून, डॉक्टरांकडून लोकांना व्यायामाचे सल्ले दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी उद्यान त्वरित खुले करणे गरजेचे आहे. याबाबत आपण पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहोत.
वैशाली डकरे, माजी महापौर