शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

संतोष ट्राॅफीसाठी उद्यापासून कोल्हापुरात शाहू स्टेडीयमवर धुमशान, महाराष्ट्र-अंदमान निकोबार यांच्यात सलामीची लढत

By सचिन भोसले | Published: October 12, 2023 6:47 PM

कोल्हापूरच्या पोरांकडे विशेष लक्ष

कोल्हापूर : मानाच्या संतोष ट्राॅफी राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेतील एफ गटातील सहा राज्य संघांचे एकूण १५ सामने कोल्हापूरातील छत्रपती शाहू स्टेडीयमवर आज, शुक्रवारपासून होत आहे. सलामीची लढत यजमान महाराष्ट्र- अंदमान निकोबार या दोन संघात सकाळी ८.३० वाजता होणार आहे.सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेतील सामने कोल्हापूरच्या या फुटबाॅल पंढरीत होत आहेत. यासाठी के.एस.ए.च्यावतीने अध्यक्ष मालोजीराजे यांचे विशेष प्रयत्न लाभले आहे. आज, शुक्रवारपासून सकाळच्या सत्रात दोन, तर दुपारच्या सत्रात एक असे एकूण तीन सामने एक दिवसाआड होणार आहेत. या एफ गटातून दोन गुणाक्रमे विजेते संघ स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.आज, शुक्रवारपासून होणाऱ्या या स्पर्धेच्या एफ गटातील सामन्यांना सुरुवात होत आहे. महाराष्ट्रासह अंदमान-निकोबार, तेलंगणा, आंध्रप्रदेश, लक्षद्वीप, त्रिपुरा हे संघ कोल्हापूरात दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. या संघांनी पोलो मैदानावर सरावासही सुरुवात केली आहे. एफ गटातील सामन्यांचे उदघाटन आज, शुक्रवारी सकाळी ८.०० वाजता विफाचे उपाध्यक्ष व एआयएफएफचे सदस्य मालोजीराजे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.कोल्हापूरच्या पोरांकडे विशेष लक्षफुटबाॅल पंढरीत होणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व कोल्हापूरचा निखील कदम करीत आहे. तर त्याच्यासोबत पवन माळी, संकेत साळोखे, अरबाज पेंढारी, हेही स्थानिक खेळाडू या संघात खेळणार आहेत.चौघांनाही हे मैदान फॅमिलीअर आहे. त्याचा लाभ यजमान संघाला असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. या चौघांची कामगिरीकडे स्थानिक खेळाडूंसह फुटबाॅलप्रेमींचे लक्ष लागून राहीले आहे.सामनेसकाळी ८.३० वा. महाराष्ट्र - अंदमान निकोबारसकाळी ११.३० वा. आंध्रप्रदेश- त्रिपूरा

दुपारी ३.३० वा. तेलंगणा- लक्षद्वीपफोटो : १२१०२०२३ कोल- फुटबाॅल, ०२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल