आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0२ : जिल्ह्यात रविवारी पावसाने उघडीप दिली. अधून मधून किरकोळ सरी कोसळत राहिल्या असल्या तरी धरणक्षेत्रात अद्यापही पावसाची रिपरिप सुरू आहे. उघडीप दिल्याने नद्यांची पाणी पातळी कमी होत असून पंचगंगेची पातळी २६.८ फुटापर्यंत आली आहे. सोळा बंधारे पाण्याखाली असून राज्य परिवहन महामंडळाचे पाच मार्गावरील वाहतूक अंशता बंद करण्यात आली आहे. गेले चार-पाच दिवस सुरू असलेला पावसाचा जोर शनिवारी दुपारपासून काहीसा ओसरला. रविवारी सकाळ पासून तर कडकडीत ऊन पडले, अधून मधून हलक्या सरी वगळता दिवसभर कोल्हापूर शहरातही ऊन राहिले. पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर डोंगरमाथ्यावरील भात, भुईमूगाच्या भागलणीच्या कामाला वेग आला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २०.३७ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४०.५० मिली मीटर झाला आहे.पंचगंगा नदीवरील सात, भोगावती वरील चार तर कासारी नदीवरील पाच अशा सोळा बंधारे अद्याप पाणी खाली आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्याने व पावसाने रस्ता खराब झशल्याने रंकाळा-बावेली, रंकाळा-बुरंबाळ, रंकाळा-कुंभवडे, रंकाळा-चौके तर आजरा -गावठाण या मार्गावरील वाहतूक अंशता बंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप
By admin | Published: July 02, 2017 5:35 PM