शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

भराव खचून महिना उलटला तरी कार्यवाही शून्य--वाहतूक अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:53 AM

कळंबा : साळोखेनगर व आपटेनगर प्रभागांना जोडणाºया मुख्य रस्त्यासह दोन्ही प्रभागांच्या सीमांच्या मध्यातून वाहणाºया नाल्यावर पूल बांधणे, स्टॉर्म वॉटर प्रकल्प राबविणे, हमरस्त्यास जोडणारे उपरस्ते विकसित

ठळक मुद्देतुळजाभवानी मंदिर ते साळोखेनगर मार्गास ‘नगरोत्थान’च्या निकृष्ट कामाचा फटका पण स्टॉर्म वॉटर प्रकल्पाचे पाणी आजतागायत नळ्यातून ओढ्यात आलेच नाही

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : साळोखेनगर व आपटेनगर प्रभागांना जोडणाºया मुख्य रस्त्यासह दोन्ही प्रभागांच्या सीमांच्या मध्यातून वाहणाºया नाल्यावर पूल बांधणे, स्टॉर्म वॉटर प्रकल्प राबविणे, हमरस्त्यास जोडणारे उपरस्ते विकसित करणे, रस्त्यालगतचे पदपथ विकसित करणे, ही नगरोत्थान योजनेतून झालेली व्हीयुबी निविदाधारक कंपनीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने सुमार दर्जाच्या कामाचा फटका प्रभागातील नागरिकांना सोसावा लागत आहे. स्टॉर्म वॉटरचे पाणी नळ्यातून ओढ्यात न येता नागरी वस्तीसह रस्त्यावर वाहत आहे, तर नाल्यालगतच्या पुलाचा भराव खचून रस्ताही खचला आहे.आपटेनगर प्रभागातील तुळजाभवानी मंदिर ते साळोखेनगर प्रभागातील साई मंदिर अंदाजे २ कि.मी. रस्ता विकसित करणे यासह उपरस्ते, नाल्यावर पूल बांधणे, स्टॉर्म वॉटर प्रकल्प विकसित करणे, पदपथ तयार करणे, आदी बाबींची नगरोत्थान योजनेंतर्गतची कोट्यवधी रुपयांची कामे युव्हीबी कंपनीस देण्यात आली. दिलेली कामे मुदतीत पूर्ण झाली नाहीत. या कामास आजअखेर पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली. निविदेच्या अवघी साठ टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे होणार कधी, याचे उत्तर प्रशासनासच ठावुक.सुमार दर्जाच्या कामाने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानेराजे संभाजी विद्यालयानजीकच्या ओढ्यावरील पुलाच्या बाजूचा भराव वाहून गेला, शिवाय रस्ताही खचला. दोन प्रभागांना जोडणाºया या पुलावर केएमटीसह अन्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते, यास अडथळा निर्माण झाला आहे. साळोखेनगरातील सूर्यकांत मंगल कार्यालय ते राजे संभाजी विद्यालय नागरी वस्त्यात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी स्टॉर्म वॉटर प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नळे टाकून सिमेंटचे चेंबर बांधण्यात आले. पण स्टॉर्म वॉटर प्रकल्पाचे पाणी आजतागायत नळ्यातून ओढ्यात आलेच नाही. ते नजीकच्या महादेव नागरी वस्तीत शिरते, तर काही रस्त्यावरून वाहते. स्टॉर्म वॉटर प्रकल्पाची सिमेंटची चेंबर रस्त्यापेक्षा उंच व उघडी आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. मुख्य रस्त्यांना मिळणाºया उपरस्त्यांना डांबर लागलेच नाही. शिवाय पदपथही विकसित झाले नाहीत. निविदाधारक कंपनीच्या कामाच्या दर्जावर नियंत्रणासाठी उपशहर अभियंता एस. के. माने यांची नियुक्ती करण्यात आली होती; पण सुमार दर्जाची कामे पाहता कसले नियंत्रण ठेवले हे कोडे उलगडत नाही. आज सहा महिने झाले ठेकेदार कामाकडे फिरकलाच नाही. त्यामुळे संतप्त लोकप्रतिनिधी राजू दिंडोर्ले व प्रतीक्षा पाटील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वाहून गेलेल्या पुलाच्या भरावाची पाहणी करून, तत्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी प्रशासनास लेखी कळवले, पण पाहणीपलीकडे कार्यवाही शून्य तर प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत, यासाठी नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांनी प्रशासनामागे तगादा लावलाच, पण आजही प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे पालिका प्रशासनाने याप्रश्नी पुढाकार घ्यावा, ही मागणी होत आहे.नगरोत्थान योजनेंतर्गत निकृष्ट कामे करण्याच्या या निविदाधारक कंपनीस काळ्या यादीत टाकून निकृष्ट कामाचा प्रशासनाने पैसा वसूल करावा.- राजू दिंडोर्ले, नगरसेवकनगरोत्थानमधील साळोखेनगरातील कामे अद्यापही प्रलंबित आहेत, तर बरीच निकृष्ट दर्जाची झाली आहेत. प्रशासनाने त्वरित कामे पूर्ण करून घेऊन मगच उर्वरित पैसे अदा करावेत.- प्रतीक्षा पाटील,नगरसेविका, साळोखेनगर.