पेठवडगाव : पुणे-बंगलोर महामार्गावर वाठार तर्फ वडगाव हे गाव सुनियोजित पद्धतीने वसले असून गावात विविध विकासाच्या संधी आहेत. वाढते औद्योगिक आणि रहिवाशी क्षेत्रामुळे नियोजनबद्द पद्धतीने कामे केल्यास गावाचा आणखी विकास होईल, असा विश्वास आमदार राजू आवळे यांनी व्यक्त केला. वाठार तर्फ वडगाव येथील हिंदमाता कॉलनीतील तीन गल्ल्या, झेंडा चौक ते शिंदे गल्ली रस्ता, मुस्लिम समाज कब्रस्तान संरक्षण भिंत अशी २५ लाख रुपयांच्या कामाची उद्घाटने आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राजू आवळे म्हणाले की, वाठार परिसरात आर्थिक, शैक्षणिक व रहिवाशी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिसरातील नागरिक या भागात राहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांची गरज निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने याकडे संधी म्हणून पाहत गावाच्या विकासाचे नियोजन केले पाहिजे. योग्य नियोजन करून पायाभूत सुविधा निर्माण केल्यास पंचक्रोशीत वाठारचे नाव होईल. यासाठी निधीची कमतरता पडणार नाही.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासोा मस्के, माजी सरपंच सुहास पाटील, सुर्यकांत शिर्के, ग्रा. पं. सदस्य जावेद कुरणे, चिमाजी दबडे, आण्णासोा शिंदे, बाबासोा पटाईत, परशुराम मस्के, गुणवंत शिंदे, राहुल पोवार, श्रीकांत कुंभार, संदीप कुंभार, भारत मराठे, सुनील जोशी महाराज आदी उपस्थित होते.
११ वाठार आवळे उद्घाटन