शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आजऱ्याला ‘आमदार’कीची संधी ? : ४७ वर्षांनंतर आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:44 PM

भाजपने न मागता चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली तर लढण्याची तयारी दाखविणारे आजरा येथील अण्णाभाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी व भाजपमधून लढण्यासाठी

ठळक मुद्देअशोक चराटी, रमेश रेडेकर यांनी एकसंध राहण्याची गरजदुरंगी लढत झाली तरच भाजपला संधी निर्माण होऊ शकते.

कृष्णा सावंत ।आजरा : भाजपने न मागता चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली तर लढण्याची तयारी दाखविणारे आजरा येथील अण्णाभाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी व भाजपमधून लढण्यासाठी प्रबळ इच्छुक असलेले उद्योजक रमेश रेडेकर यांच्यात समझोता होऊन दोघांपैकी एकजण रिंगणात उतरल्यास आजरा तालुक्याला मोठ्या कालखंडानंतर पुन्हा आमदारकीची संधी मिळू शकते.

पक्षाने संधी दिल्यास सोडणार नसल्याचे अशोक चराटी सांगत आहेत. चराटी यांचे कार्यकर्तेही अलीकडच्या काळात उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पक्षाने उमेदवारी दिली तरच लढणार, अन्यथा पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका स्पष्टपणे चराटी यांनी घेतली आहे.

रमेश रेडेकर यांनी दोन वर्षांपासून चंदगड विधानसभेची तयारी सुरू केली आहे. संपर्क दौरे, गाठीभेटी जोरदार सुरू आहे. मतदारसंघातील गावे पिंजून काढत आहेत. जिल्हा परिषद सदस्या व त्यांच्या पत्नी सुनीता रेडेकर, मुलगा आदित्य रेडेकर, भाऊ संजय रेडेकर यांच्यासह कार्यकर्तेही गावागावांत जाऊन रेडेकर यांच्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे रेडेकर सध्यातरी तयारीच्या बाबतीत सर्वांत पुढे आहेत.

चराटी यांनी तर ६१ व्या वाढदिवसानिमित्त मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करून भाजप व शिवसेनेमधील अनेक इच्छुकांना धक्काच दिला. त्यामुळेच अनेकांनी चराटी यांच्यासाठी मंत्रिपदाच्या दर्जाचे पद मिळविण्यासाठी प्रयत्न करूया, अशी विनवणी केली तर काहींनी चराटी यांनी रिंगणात न उतरता आम्हाला आशीर्वाद द्यावा, अशा सूचना केल्या. चराटी यांनी पक्षाने संधी दिली तर लढण्याची इच्छा व्यक्तकेल्याने भाजपमधील अनेक इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे.

रेडेकर यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास रेडेकर यांच्यासाठी मी पुढे राहणार असल्याचे मेळाव्यात चराटी यांनी सांगितले. रेडेकर यांनीही भाजपचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितल्याने भाजपमधून कुणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे.

सन १९७२ मध्ये माजी आमदार कै. वसंतराव देसाई यांच्या आमदारकीनंतर ४७ वर्षांत आजºयाचा कोणीही आमदार झाला नाही. तालुका तीन विभागांत विभागल्याने तशी संधीही मिळाली नाही. परंतु, संधी चालून आल्याने चराटी किंवा रेडेकर यांच्या रूपाने आजºयाचा आमदार पुन्हा व्हावा, अशीजनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी चराटी व रेडेकर यांच्यात एकसंध होण्याची गरज आहे.दुरंगी लढत झाली तर संधीकाँगे्रस, राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने शिवसेना, भाजपही निश्चित एकत्र येणार. राष्ट्रवादीमधून आमदार संध्यादेवी कुपेकर किंवा त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यापैकी एकास उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. परंतु, भाजप-शिवसेनेतून अनेकजण इच्छुक आहेत. भाजपमधून बंडखोरी झाल्यास राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुरंगी लढत झाली तरच भाजपला संधी निर्माण होऊ शकते. 

शिवसेना, भाजपमध्ये इच्छुकांचा भरणाशिवसेनेमधून प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खाडेकर, राजेश पाटील इच्छुक आहेत, तर भाजपमधून रेडेकर यांच्यासह माजी राज्यमंत्री भरमू पाटील, गोपाळराव पाटील आणि उमेदवारी दिली तर चराटी या इच्छुकांचा भरणा आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर