कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी ताराराणी-भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँगे्रसपाठोपाठ शिवसेनेनेही ४१ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली. शिवसेना भवन (मुंबई) येथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार व आमदार राजेश क्षीरसागर यांनी ही यादी जाहीर केली. या यादीत पक्षाच्या निष्ठावंतांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या १४ पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक राजू हुंबे यांच्या पत्नी सुनीता यांना ‘सम्राटनगर’मधून, अपक्ष नगरसेविका रेखा पाटील यांचे पती व एकेकाळचे शिवसैनिक राजेंद्र पाटील यांना ‘रंकाळा तलाव’ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक प्रदीप पवार यांना ‘राजारामपुरी एक्स्टेंशन’ येथून, कॉँग्रेसच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे यांना ‘सिद्धार्थनगर’मधून, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांच्या पत्नी अमृता यांना ‘शिपुगडे तालीम’मधून, कॉँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास गौडदाब यांच्या पत्नी विमल यांना ‘कदमवाडी’मधून उमेदवारी देण्यात आली आहे.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला आघाडी शहरप्रमुख पूजा भोर, शिवसेना उपशहरप्रमुख अरविंद मेढे यांना ‘भोसलेवाडी-कदमवाडी’मधून, उपशहरप्रमुख अनिल पाटील यांना ‘खोल खंडोबा’तून, उपशहरप्रमुख प्रकाश सरनाईक यांच्या पत्नी रजनी यांना ‘चंद्रेश्वर’मधून, उपशहरप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या पत्नी वैष्णवी यांना महाडिक वसाहतमधून, शहरप्रमुख विशाल देवकुळे यांच्या मातोश्री सरोजिनी देवकुळे यांना ‘टाकाळा खण-माळी कॉलनी’मधून, विभागप्रमुख रवींद्र माने यांना ‘कसबा बावडा पूर्व’तून, शाखाप्रमुख राहुल माळी यांना ‘कसबा बावडा हनुमान तलाव’ येथून, विभागप्रमुख राजू काझी यांच्या पत्नी शाहीन यांना ‘कसबा बावडा पॅव्हेलियन,’ झोपडपट्टी सेनेचे अध्यक्ष संजय बावडेकर यांना ‘नाथागोळे तालीम’मधून, निष्ठावान शिवसैनिक धनाजी बिरंजे यांचे पुतणे व विभागप्रमुख सचिन बिरंजे यांना रंकाळा स्टॅँड प्रभागातून, विभागप्रमुख विक्रम पोवार यांच्या पत्नी दीपाली यांना ‘ट्रेझरी आॅफिस’ येथून, शहर महिला आघाडी संघटक रूपाली नेताजी कवाळे यांना ‘राजारामपुरी’मधून, वाहतूक सेनेचे अध्यक्ष नियाज खान यांना ‘शास्त्रीनगर-जवाहरनगर’मधून, तर माजी नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांचे चिरंजीव उदय यांना ‘दुधाळी पॅव्हेलियन’मधून उमेदवारी मिळाली आहे. (प्रतिनिधी)दुसरी यादी चार दिवसांतशिवसेनेकडून उमेदवारांची ४१ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, दुसरी यादी चार दिवसांत जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेची निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी
By admin | Published: October 01, 2015 12:55 AM