कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कोल्हापूरबरोबरच देशातील युवापिढी स्टार्टअपच्या माध्यमातून योगदान देऊ शकते. ही संधी कोल्हापूर स्टार्टअप मिशनअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी (www.kolhapurstartupmission.com) या संकेतस्थळावर अर्ज करावेत. त्यातील विजेत्या स्टार्टअप्सना आयआयटी कानपूरच्यावतीने प्रत्येकी पाच लाख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर हे इन्क्युबेशनसाठी सहकार्य करणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी ह्यकोल्हापूर स्टार्टअप मिशनह्णच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
लोकसहभागातून नागरी समस्यांची सोडवणूक हे कोल्हापुरात पहिल्यापासून होत आहे. मात्र, युवापिढीने तंत्रज्ञान, नवकल्पनांच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक केल्यास शहराचा विकास गतीने होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.अशी असेल स्टार्टअप निवड प्रक्रिया१) स्टार्टअपकडून संकल्पना मागविणे : दि. १५ ते २४ जानेवारी२) स्टार्टअप कनेक्ट वेबिनार : १८ ते २४ जानेवारी३) अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्टार्टअपच्या नावांची घोषणा : २६ जानेवारी४) अंतिम फेरीतील स्टार्टअप्सकडून सादरीकरण : २८ आणि २९ जानेवारी५) विजेत्या स्टार्टअप्सची घोषणा : ३१ जानेवारी