मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत विविध शैक्षणिक संघटनांनी एकत्रितपणे निर्णय घेतला. अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, तर आमदार जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते. बाह्य संस्थेकडून मूल्यमापनाचा निर्णय रद्द करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाकडून आंदोलन करण्यात येईल. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले जाईल. तिसऱ्या टप्प्यात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शैक्षणिक व्यासपीठातर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल. शासनाने हा आदेश रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन हे चौथ्या टप्प्यात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी दादासाहेब लाड, सुरेश संकपाळ, बी. जी. बोराडे, राजाराम वरूटे, सी. एम. गायकवाड, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, के. के. पाटील, उदय पाटील, इरफान अन्सारी, मिलिंद पांगिरेकर, संदीप पाटील, राजेश वरक आदी उपस्थित होते.
चौकट
निर्णय रद्दसाठी शिक्षणमंत्र्यांना भेटणार
बाह्य संस्थेकडून शिक्षकांच्या मूल्यमापनाला सर्व शिक्षक, पदवीधर आमदारांचा तीव्र विरोध आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात येईल. सन १९८१ च्या सेवा शर्ती नियमानुसार शिक्षकांचे मूल्यमापन झाले पाहिजे. बाह्य संस्थेबाबतचा हा निर्णय शासनाला मागे घ्यावाच लागेल, असे आमदार आसगावकर यांनी सांगितले.
चौकट
शिक्षकांना रविवारी प्रशिक्षण
जिल्ह्यात कोरोना बालक जनजागृती अभियान सुरू केले जाणार आहे. त्याद्वारे शिक्षक हे कोरोनाबाबत विद्यार्थी, पालकांची जनजागृती करतील. याबाबत रविवारी (दि.३०) बालरोग तज्ज्ञ हे शिक्षकांना ऑनलाईन समुपदेशन करून प्रशिक्षित करतील, असे आमदार आसगावकर यांनी सांगितले.
फोटो (२७०५२०२१-कोल-शैक्षणिक व्यासपीठ) : कोल्हापुरात गुरुवारी शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी एस. डी. लाड, दादासाहेब लाड, बी. जी. बोराडे, सुरेश संकपाळ, आदी उपस्थित होते.