शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

बेळगावच्या नामांतरास विरोध

By admin | Published: February 16, 2015 12:18 AM

शट्टीहळ्ळीतील साहित्य संमेलनात ठराव : संकटे थोपविण्याची ताकद साहित्यात : काळे

नेसरी : लेखक साहित्यातून खऱ्या माणसाचा शोध घेत असतो. प्रसूतीच्या वेदनेपेक्षाही गरिबीच्या वेदना खूप असतात. चारही बाजूंनी येणाऱ्या संकटांना थोपविण्याची ताकद साहित्यात दडली आहे. तेव्हा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक वामन काळे यांनी दिला. सीमाभागातील शट्टीहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील दुसऱ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जि. प.च्या माजी सदस्या अंजना रेडेकर, मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पिराजी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या संमेलनात बेळगावच्या नामांतरास विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. बाळासो कालकुंद्रीकर यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. लेझीम, झांजपथक, धनगरी ढोलांच्या निनादात दिंडी काढण्यात आली. यानंतर बाबासाहेब कुपेकर साहित्यनगरीचे उद्घाटन एम. टी. कळविकट्टे यांच्या हस्ते, तर व्यासपीठाचे उद्घाटन उद्योजक शिवाजीराव कळविकट्टे यांच्या हस्ते झाले. लेखक वामन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन संमेलनास प्रारंभ झाला. अध्यक्षीय भाषणानंतर डॉ. विठ्ठलराव भांदुर्गे व डॉ. शशिकला भांदुर्गे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.दुसऱ्या सत्रात कविसंमेलन झाले. प्रा. डॉ. चंद्रशेखर पोतदार, इंद्रजित घुर्ले, राजन कळविकट्टीकर, यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिसऱ्या सत्रात चन्नमा विद्यापीठ बेळगावच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी आजचा माणूस माणसांपासून हरवत चालला आहे या विषयावर मत मांडले. चौथ्या सत्रात नागठाण्याचे हिम्मत पाटील यांनी ‘माती’ या कथेद्वारे ग्रामीण स्त्रियांच्या व्यथा, वेदना व चीड मांडली, तर बंडूची मुंज या विनोदी कथेद्वारे हशा पिकविला.संमेलनातील ठरावराज्य पुनर्रचनेत बहुभाषिक ८६५ खेडी कर्नाटकात डांबली गेली. मात्र, महाराष्ट्राने दाखल केलेला न्यायालयातील दावा महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून, न्यायालयाने खेडे हे घटक भाषिक, बहुसंख्य, भौगोलिक संलग्नता व लोकेच्छा या चतु:सूत्रीनुसार प्रश्न सोडवावा.साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.मराठी जनतेला कर्नाटक शासनाने भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सर्व शासकीय परिपत्रके, कागदपत्रे मराठी भाषेतून द्यावीत.मराठी संस्कृती जपलेल्या बेळगावच्या नामांतरास विरोध.