शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

केंद्रीय किचन पद्धतीला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 7:01 PM

राज्य शासनाने केंद्रीय किचन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केल्याने राज्यातील शालेय पोषण आहार कामगार बचत गटांच्या महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे; त्यामुळे ही पद्धती मागे घ्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय किचन पद्धतीला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विरोधजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू

कोल्हापूर : राज्य शासनाने केंद्रीय किचन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केल्याने राज्यातील शालेय पोषण आहार कामगार बचत गटांच्या महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे; त्यामुळे ही पद्धती मागे घ्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाने याबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास धरणे आंदोलनाचे रूपांतर बेमुदत उपोषणामध्ये होईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.‘माकप’चे नेते चंद्रकांत यादव व संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी हे आंदोलन सुरू केले आहे. ‘सेंट्रल किचन हाय हाय...महिला बचत गटांच्या पोटावर पाय...’, ‘केंद्रीय किचन पद्धतीचा आदेश काढणाºया सरकारचा निषेध असो’, ‘महिलांचा रोजगार हिसकावून घेणाºया केंद्रीय पद्धती रद्द करा’ अशा आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान, याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, २००३ पासून शालेय पोषण आहार योजना चालू असून, केंद्र व राज्य सरकारतर्फे कार्य चालत आहे. यामध्ये महाराष्ट्रात एक लाख ६० हजार महिला काम करत आहेत. शासनाच्या धोरणानुसार बचत गट व व्यक्तिगत स्वरूपात काम करून घेतले जाते. जिल्ह्यात सात हजारपर्यंत महिला यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत.

१६ मार्च २०१९ ला राज्य शासनाने शिक्षण संचालकांतर्फे शालेय पोषण आहारासंदर्भात आदेश काढला. यामध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागातील शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीकरिता स्वारस्याची अधिव्यक्ती मागविण्याबाबत आदेश काढला आहे.यामुळे यापूर्वीच्या शासनाच्या उद्देशामध्ये धोरणात्मक बदल केले आहेत. त्याचे परिणाम महिला व विद्यार्थ्यांवर होणार आहेत; त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलनाचे रूपांतर बेमुदत उपोषणामध्ये केले जाईल.आंदोलनात संघटनेच्या उपाध्यक्षा वर्षा कुलकर्णी, सचिव अमोल नाईक, सहसचिव अश्विनी साळोखे, साधना पाटील, शशिकला रायकर, कल्पना खोराटे, सुनीता मोहिते, संगीता घोरपडे, ललीता सावंत, आदी सहभागी झाल्या आहेत.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर