शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
2
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
3
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
4
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
5
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
6
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
7
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
8
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
9
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
10
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
11
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
12
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
13
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
14
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
15
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
16
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
17
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
18
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
19
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
20
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

काँग्रेसची नोटाबंदी विरोधात निदर्शने

By admin | Published: January 07, 2017 1:14 AM

जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन : फसलेल्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी

इचलकरंजी : ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेच्या पदरी दारिद्र्य’ अशी परिस्थिती नोटाबंदीच्या निर्णयामुळे झाली आहे. पूर्णत: फसलेल्या या निर्णयातून मोदी सरकारने शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हातातील पैसा काढून घेतला आहे, अशा आशयाची टीका येथील शहर कॉँग्रेसच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी प्रांत कार्यालयावर झालेल्या मोर्चातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.येथील शहर कॉँग्रेसने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे समन्वयक सदस्य रघुजी देसाई, प्रदेश कॉँग्रेस समितीचे समन्वयक ज्ञानज्योत सावंत, माजी मंत्री प्रकाश आवाडे व शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले.आंदोलनकर्त्यांसमोर प्रदेश कॉँग्रेसचे सचिव तौफिक मुल्लाणी, अहमद मुजावर, कामगार नेते शामराव कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. यावेळी अशोकराव आरगे, अशोकराव सौंदत्तीकर, महावीर कुरूंदवाडे, आदी पदाधिकाऱ्यांसह आजी-माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, आदी उपस्थित होते.गडहिंग्लज : नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली असून, शेतकरी, कामगार, महिला, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीयांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून, त्यांच्यावर विवेकशून्य निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे, अशा आशयाचे निवेदन गडहिंग्लज तालुका काँगे्रस समितीतर्फे येथील तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर, शहराध्यक्ष बसवराज आजरी, विद्याधर गुरबे, अजित बंदी, दयानंद पट्टणकुडी, रावसाहेब पाटील, तानाजी कुराडे, प्रशांत देसाई, इम्रान मुल्ला, राजशेखर यरटे, उदयकुमार देसाई, अरुण बेल्लद, सिद्धाप्पा कल्याणी, समावेश होता.शिरोळ : नोटाबंदीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिरोळ तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार ए. वाय. दिवे यांना देण्यात आले. मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन पाठवू, असे आश्वासन नायब तहसीलदार दिवे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव अर्चना संकपाळ, लोकसभा युवकचे सरचिटणीस किरण पाटील, रुपेश मोरे, रणजित जगदाळे, संतोष आवटी, उमेश काळे, शीतल मिसाळ, गोमटेश गतारे, संतोष चौगुले, रफीक जमादार, दीपक माने उपस्थित होते. मलकापूर : केंद्र शासनाने नागरिकांना बँकामार्फत पैसे उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा शाहूवाडी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन नायब तहसीलदार विजय जमादार यांना देण्यात आले. निवेदनावर सभापती पंडितराव बलवडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाषराव इनामदार, माजी जि. प. सदस्या स्नेहा जाधव, माजी पं. स. सदस्य यशवंत सुतार, माजी उपसभापती विष्णू पाटील, सरपंच विष्णू यादव, लक्ष्मण पाटील, शामराव कांबळे, अमर खोत आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.चंदगड : शासनाने त्वरित रोख चलनात वाढ करावी व एटीएममधील रकमेतही वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रीय काँगे्रसतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांना देण्यात आले आहे. निवेदनावर, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, सभापती ज्योती पाटील, उपसभापती शांताराम पाटील, जि. प. सदस्य राजेंद्र परीट, तात्यासाहेब देसाई, अनिल सुरूतकर, पं. स. सदस्य तुळसा तरवाळ, मारुती पट्टेवार, नामदेव पाटील, अनुराधा पाटील, निंगो गुरव, गजानन कुंभार, बंडू चिगरे, शिवाजी फडके, दयानंद पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.हातकणंगले : नोटबंदीच्या निषेधार्थ शुक्रवारी हातकणंगले तालुका काँग्रेस (आय)च्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने नायब तहसीलदार अर्चना पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये राजू जयवंतराव आवळे यांच्यासह भगवान जाधव, भैरवनाथ पवार, रहमान मुलाणी, शकील आतार आदी उपस्थित होते.फसलेला : निर्णयदहशतवाद्यांना होत असलेल्या काळ्या पैशाचा पुरवठा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटा या तीन मुद्द्यांवर भाजप सरकारने नोटाबंदी केली; परंतु कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने त्याचा प्रचंड फटका सर्वसामान्यांना बसला आहे. हा निर्णय जाहीर केल्यापासून देशामध्ये आर्थिक अराजकता माजली असून हा निर्णय पूर्णपणे फसलेला आहे असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.