शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

देवेगौडा यांच्या भाजपशी हातमिळवणीला विरोध, महाराष्ट्र जनता दलाची भूमिका

By विश्वास पाटील | Published: September 23, 2023 2:03 PM

कोल्हापूर : एचडी कुमारस्वामी यांनी एचडी देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व ...

कोल्हापूर : एचडी कुमारस्वामी यांनी एचडी देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाशी युती ही भूमिका महाराष्ट्रातील जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुण्यात शनिवार (दि. ३० सप्टेंबर) होत आहे. या बैठकीत पुढील भूमिका, धोरण व निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका बैठकीचे निमंत्रक प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. विलास सुरकर, साजिदा निहाल अहमद, मनवेल तुस्कानो, सलीम भाटी, ॲड. रेवण भोसले, ॲड. नंदेश अंबाडकर, युयुत्सु आर्ते, विठ्ठल सातव, प्रकाश लवेकर, दत्तात्रय पाकिरे यांनी जाहीर केली आहे.समाजवादी व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारे राज्यातील जनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारीणी सदस्य व निमंत्रित प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय, साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल येथे होत आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.महाराष्ट्रातील बहुतांशी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष या विचारसरणीमधून आले आहेत. हे सर्व कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष व विज्ञाननिष्ठ विचारधारेचे आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील संविधान विरोधी, लोकशाही व जनहित विरोधी, मनुवादी फॅसिझमच्या पुरस्कर्त्या धर्मांध व जातीयवादी भाजप संघ प्रणीत राजकारणाचा, राज्य आणि केंद्र सरकारचा व अशा सर्व प्रवृत्तींचा विरोध करणे ही जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षाची व कार्यकर्त्यांची भूमिका प्रथमपासूनच होती, आजही तीच आहे आणि पुढेही तीच कायम राहील अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र जनता दलाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकBJPभाजपा