लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाबाबतचे सर्वपक्षीय कृती समितीचे आज, गुरुवारी होणारे ‘रास्ता रोको आंदोलन’ स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी समितीच्या नेते, कार्यकर्त्यांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी याबाबत दोनच दिवसांत बोलून लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही सुभेदार यांनी दिली. पुलाच्या कामाबाबत दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ कृती समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत रास्ता रोको आंदोलन जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव कृती समितीसमोर ठेवला. त्यानुसार दुपारी चार वाजता समितीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले; परंतु प्रत्यक्षात सहा वाजता बैठक सुरू झाली. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, सदाशिवराव मंडलिक खासदार असताना या नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. सध्याचा जुना पूल १३७ वर्षांपूर्वीचा आहे. काही बरेवाईट होऊ नये म्हणून आमची धडपड सुरू आहे. काम लवकर सुरू झाले पाहिजे. हौसे, गवसे कुणीही पुलाबाबत काहीही बोलत आहेत. मात्र कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. सहनिमंत्रक बाबा पार्टे म्हणाले, आम्हाला रस्त्यावर (पान ६ वर)...अन् कृती समितीचे पदाधिकारी परत निघालेलक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी समन्वयाची भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार दुपारी चार वाजताच पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात या बैठकीचा समावेश नव्हता. ताराराणी सभागृहात ‘आपत्कालीन’ची बैठक सुरू होती. त्यामुळे पाचनंतर संपत चव्हाण, अनिल कदम हे सभागृहाकडे गेले; परंतु वेळ लागणार असे सांगत ते परत आले. अखेर साडेपाच वाजता आर. के. पोवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. याचवेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक भारतकुमार राणे आले. विनंती करीत कार्यकर्त्यांना थांबविले.
पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आंदोलन स्थगित
By admin | Published: May 18, 2017 12:19 AM