शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश

By admin | Published: January 02, 2015 10:39 PM

दीपक पवार यांची माहिती : कोट्यवधीची माया गोळा केल्याचा आरोप

सातारा : नव्याने बांधण्यात आलेल्या अभयसिंहराजे भोसले संकुलातील २५ गाळे वाटपांमध्ये लाचखोर सचिव मनवे आणि एका पदाधिकाऱ्याने कोट्यवधींची माया गोळा करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पणन आयुक्त दिनेश ओळकर यांना दिले असल्याची माहिती भाजपाचे दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पवार म्हणाले, भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांमध्ये पोटभाडेकरू ठेवून दारू, गुटखा असे व्यवसाय सुरू आहे . बाजार समितीने ज्या मालकांना भाडेतत्त्वावर गाळे दिले आहेत, त्यांनी हेच गाळे पोटभाडेकरूंना भाड्याने देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये भाडे वसूल करत आहेत. मूळ गाळेधारक पदाधिकाऱ्यांना हप्ते देऊन बाजार समितीचे नुकसान करत आहेत,’ असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.संकुलाच्या इमारतीसाठी पणन खात्याने एक कोटी चाळीस लाख अनुदान दिले होते. तो खर्च एक कोटी ९४ लाखांपर्यंत कसा गेला, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एका गाळ्यामध्ये गुटखा, तंबाखू असे पदार्थ मिळूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी एका नेत्याला दोन किलो चांदीची तलवार भेट दिली आणि लाचखोर सचिव मनवे यांना खूश केले, असाही दीपक पवार यांनी आरोप केला. (प्रतिनिधी)उदयनराजेंच्या भूमिकेचे स्वागत शेती उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करून भ्रष्ट संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. उदयनराजे यांनी बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधी आवाज उठविल्यास कोट्यवधींचा भ्रष्टाचार बाहेर पडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही दीपक पवार यांनी यावेळी सांगितले.