कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार शहरातील २० वर्षांतील आरक्षणे, हॉटेल सयाजीजवळील डीपी रोड आणि रमणमळ्यातील वॉटर बॉडीशी संबंधित कागदपत्रांची माहिती सोमवारी महापालिका आयुक्तांकडून मागविली. त्यासंबंधी चौकशीचे पत्रही त्यांनी दिले.
शुक्रवारी पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या २० वर्षांत महापालिकेने कोणती आरक्षणे उठवली याची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यास महापालिका पदाधिकाऱ्यांनी ‘अशी चौकशी कराच’ असे प्रत्युत्तर दिले. आमदार सतेज पाटील यांनीही रविवारी ‘ब्लॅकमेलिंग केले तरी त्यास घाबरत नाही,’ असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी ही माहिती मागविली.
त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते म्हणतात, ‘शहरात विकासकामांचा धडाका पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरू लागल्याने जिल्ह्यातील ‘सूर्याजी पिसाळ’ माझ्यावर चुकीचे आरोप करीत सुटले आहेत. त्यासाठी जनतेसमोर सत्य बाहेर येण्यासाठी महानगरपालिकेतील कारभाराच्या चौकशीला सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्तांना पत्र देऊन आरक्षणाची माहिती मागविली आहे. या माहितीवरून या प्रकरणातील झोल आता जनतेसमोर येईल. जनतेच्या पैशांवर कुणी-कुणी तुंबड्या भरून आपले बंगले, जमिनी, रुग्णालये उभी केली हे समोर येईल.’विकासकामांचा डोलारा..पालकमंत्रिपद स्वीकारल्यापासून शहरासह जिल्ह्याच्या विकासाचा मोठा डोलारा उभा केला. जनतेवर लादलेला ५०० कोटींचे टोल भूत गाडले आणि विकासकामांची चुणूक दाखवून दिली, असेही पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे.माहितीचा तपशील असा..कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल सयाजी जुना-बंगलोर हायवे, कावळा नाका रुक्मिणीनगर परिसरातील डीपी रोड व अन्य कारणांसाठी कोल्हापूर महापालिकेने आरक्षित केलेली जागा संपादित केली आहे का? संपादन केली असल्यास सध्या हा डीपी रोड मोकळा केला आहे का ? व वापरात घेतला आहे का ?कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ नुसार मालकांनी खरेदी सूचना (पर्चेस नोटीस) देऊन सन १९९५ ते २०१५ या २० वर्षांच्या कालावधीत जी आरक्षणे वगळली, त्यांची प्रकरणनिहाय माहिती
रमणमळा नागाळा पार्कातील वॉटर बॉडी अगर त्या नावाशी सुसंगत असलेल्या जागेबाबत माहिती द्यावी. ही जागा कोणाच्या मालकीची, डेव्हलपमेंट प्लॅननुसार या जागेचा जमीन वापर काय आहे, सध्या ही जागा कोल्हापूर महानगरपालिकेने एखाद्या संस्थेस अगर व्यक्तीस हस्तांतरित केली असल्यास तो कोणत्या प्रकारच्या कराराने, किती वर्षांसाठी व कोणत्या अटी,शर्र्तींसह हस्तांतरित केली आहे, हस्तांतरणाबाबात महानगरपालिका महासभेने केलेल्या ठरावास शासनाची मंजुरी मिळाली आहे का..?तावडे हॉटेलप्रश्नी कायद्याची पायमल्ली : देसाईकोल्हापूर : शासनाने निर्माण केलेले कायदे, प्रसिद्ध केलेली परिपत्रके यांची तावडे हॉटेल परिसरप्रश्नी शासनाकडूनच पायमल्ली होत असल्याचा आरोप करत कायदे पाळायचे नसतील तर महापालिका बरखास्त करून सर्व कामकाज राज्य सरकारने पाहावे, असे आवाहन प्रजासत्ताक सामाजिक (पान ४ वर)तावडे हॉटेल परिसरात १८ कोटींचा ‘टीडीआर’ : शेटेकोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरामध्ये मौजे उचगाव येथे २०६३६ चौरस मीटर कचरा डेपो व ट्रक टर्मिनस जागा महापालिकेने सन २०१५ मध्येच ताब्यात घेऊन १८ कोटींचा टीडीआर दिला, पण प्रत्यक्ष जागेचा वापर केला नाही. सद्य:स्थितीत या जागेवर कोणतेही बांधकाम नसल्याने महिन्याभरात या जागेचा वापर कचरा डेपो व ट्रक टर्मिनलसाठी न केल्यास याबाबत महापालिकेचे सहायक संचालक धनंजय खोत व इतर संबंधित जबाबदार अधिकाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगरसेवक भूपाल शेटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
शेटे म्हणाले, गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील या जागेबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तत्कालीन आयुक्त शिवशंकर आणि ‘नगररचना’चे सहायक संचालक धनंजय खोत यांनी हा सुमारे २०६३६ चौरस मीटर टीडीआर दिलाच कसा? तसेच जर ही जागा महापालिकेच्या ताब्यात घेऊन टीडीआर दिला होता तर याची फाईल सभागृहापासून लपवली का? असे प्रश्नही त्यांनी (पान ४ वर) उपस्थित केले. कोल्हापूर शहरामध्ये कचºयाचा प्रश्न गंभीर आहे, ही सर्व जागा कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची असल्याने या सर्व जागेमध्ये शहरातील कचरा टाकण्यात यावा, अशी मागणी करून शेटे म्हणाले, ज्या पद्धतीने टीडीआर देण्याची कार्यवाही सहायक संचालक धनंजय खोत यांनी तातडीने केली, तीच तत्परता त्यांनी आता कचरा टाकण्याच्या कामातही दाखवावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली.