शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अवयवदानसाठी जागृती, सुविधांची गरज-

By admin | Published: August 17, 2016 11:51 PM

प्रेस्टिज कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे रंगनाथ आद्य यांचे मत

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. त्यानंतर विषय येतो नेत्रदानाचा. व्यक्ती मेल्यानंतरही डोळ््यांच्या माध्यमातून जिवंत राहू शकतो; ही कल्पनाच सुखावणारी असते. ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे एका व्यक्तीचे हृदय दुसऱ्या व्यक्तीला बसविल्याच्या घटना आपल्याला अचंबित करतात. मात्र, या सगळ््या घटना अपवादात्मकच घडतात. त्यापुढे जाऊन त्वचादान, किडनी दानासह अवयव दान ही संकल्पना आता रुजू पाहत आहे. मात्र, त्यासाठी काही अत्याधुनिक सेवा-सुविधांची गरज आहे. कोल्हापुरात अवयव दान चळवळ राबविणारे प्रेस्टिज कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे रंगनाथ आद्य यांचा अवयव दान दिनानिमित्त घेतलेला हा थेट संवाद..प्रश्न : अवयवदान म्हणजे काय?उत्तर : आपल्याला फक्त रक्तदान आणि त्यानंतर नेत्रदान या दोनच गोष्टी माहीत आहेत. नेत्रदानाबद्दलसुद्धा अजूनही अनास्था आहे. त्यामुळे अवयव दान ही संकल्पना रुजायला वेळ लागेल. अवयवदानात मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, बोनमॅरो, प्लेटलेट, त्वचा हे सगळे अवयव दान करून आपण एखाद्याला नवजीवन देऊ शकतो. मात्र, त्याबद्दल नागरिकांना अद्याप फारशी माहिती नाही. पूर्वी सगळ््यांना फक्त रक्तदान माहीत होते. आता नेत्रदानाने एखाद्याला नवी दृष्टी मिळते. रक्तदान सर्रास केले जाते. आईने मुलाला, मुलीने आईला आपली किडनी दान केल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. अशाच प्रकारे अन्य अवयवही आपण दान करू शकतो. प्रश्न : कोल्हापुरात अवयव दान ही चळवळ कशी सुरू झाली?उत्तर : आम्ही पहिला कार्यक्रम स्व. अनिल तेंडुलकर फौंडेशनच्या विद्यमाने आॅक्टोबर २०१५ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये घेतला. त्यामध्ये पुण्यातील एका व्यक्तीचे हृदय दुसऱ्या व्यक्तीला बसविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. कयानुस कडापट्टी प्रमुख पाहुण्या होत्या. ग्रीन कॉरिडॉर, विमानतळ अशा सगळ््या माध्यमातून केवळ ७५ मिनिटांत हृदयाचा झालेला हा प्रवास त्यांनी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना सांगितला. दुसरा कार्यक्रम १० एप्रिलला झाला आणि तिसरा कार्यक्रम लोकमत ‘सखी मंच’च्या सहकार्याने घेण्यात आला. अशारीतीने आम्ही विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये अवयवदानविषयीची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रश्न : अवयवदान संकल्पना अद्याप न रुजण्याचे कारण काय?उत्तर : अवयवदानबद्दल नागरिकांना फारशी माहिती नाही हे त्याचे प्रमुख कारण. कुटुंबातील व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या मागे असणाऱ्या नातेवाइकांनी ही जबाबदारी उचलणे गरजेचे असते. अनेकदा नागरिक नेत्रदानाचे अर्ज भरतात; पण व्यक्ती वारल्यानंतर त्यांचे नेत्रदान न करताच कुटुंबीय अंत्यविधी करतात. त्यामुळे व्यक्ती मरण पावली की कुटुंबीयांना संबंधित दवाखाने, संस्था, डॉक्टरांना त्याबद्दलची माहिती कळविणे गरजेचे असते. काहीवेळा दवाखाने आणि डॉक्टरांच्या समन्वयाचाही अभाव असतो. कुटुंबीयांनी कळविल्यानंतरही डॉक्टर अवयव नेण्यासाठी आले नाही तर त्याचा उपयोग काय? या सगळ््या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. प्रश्न : अवयव दान चळवळीतील अडचणी कोणत्या?उत्तर : पहिले कारण म्हणजे येथील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांचा अभाव. अवयव दान केल्यानंतर त्यांचे योग्यरीत्या जतन करून ते अवयव जिवंत ठेवणे महत्त्वाचे असते. प्रत्येक अवयवासाठी जिवंत राहण्याचा विशिष्ट कालावधी असतो. त्यासाठी ब्लड बँकेप्रमाणे एखादी बँक असावी लागते, जी कोल्हापुरातल्या कोणत्याच दवाखान्यात नाही. हे अवयव ट्रान्स्प्लाँट करण्यासाठी दवाखान्यांना परवानगी असणे गरजेचे असते. कोल्हापुरात केवळ अ‍ॅपल हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्स्प्लाँटची सोय आहे. ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय काही मिनिटांत दुसऱ्या ठिकाणी पोहोचवावे लागते. त्यासाठी विमान सेवा अत्यावश्यक आहे. ‘ग्रीन कॉरिडॉर’ करावा लागतो. या सगळ््या सोयींच्या अनुपलब्धतेमुळेही अवयव दान चळवळीत अडचणी निर्माण होतात. प्रश्न : अवयवदान चळवळ वाढविण्यासाठी काय आवाहन कराल?उत्तर : कोणतीही मोहीम ठरविली की तिला लगेचच नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो असे होत नाही. त्यामुळे अवयव दान ही चळवळ आधी सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करावी लागेल. अवयव दानचा अर्ज भरलेली व्यक्ती वारल्यानंतर कुटुंबीयांनी देखील त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम आखत आहोत. त्यांच्याद्वारे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा विचार आहे. एकदा का मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग दाखविला, तर शासनालादेखील आम्ही अत्याधुनिक सुविधांची गरज कशी आहे हे दाखवून त्या निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करू शकतो. - इंदुमती गणेश