चक्रेश्वरवाडी (ता. राधानगरी) येथे लाल बावटा बांधकाम कामगारांच्या नवीन शाखेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष भीमराव कुसाळे होते.
सुतार पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापन करण्यापासून बांधकाम कामगारांना विविध योजना मंजूर करण्यापर्यंत लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने फार मोठा संघर्ष केला आहे. या संघर्षातूनच बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन होऊन त्यांना विविध योजना मंजूर करून घेण्यात आल्या. बांधकाम कामगारांना लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देतो असे सांगून त्यामध्ये फार मोठे एजंट तयार होऊन कामगारांच्याकडून नोंदणीच्या नावाखाली एजंटाकडून फार मोठी आर्थिक पिळवणुक होत आहे, अशी खंत व्यक्त करून त्याला आळा बसविणे हे प्रशासनाचे व शासनाचे काम आहे आणि त्यांनी ते करावे, असे आवाहनही कॉम्रेड सुतार यांनी केले.
शिवाजी कांबळे म्हणाले, लाल बावटा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून गावागावांमध्ये बांधकाम कामगारांना संघटित करून व त्यांची नोंदणी करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी संघटना कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी अशोक सुतार, कृष्णात सुतार, संतोष कांबळे, संदीप यादव, संभाजी तापेकर, समीर कुसाळे, साताप्पा सुतार, दीपक वागणेकर, युवराज कुसाळे, आदी उपस्थित होते.