याबाबत माहिती अशी, नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे बनावट नोटा खपवत असताना संशयित विद्या राहुल कदम (वय ३५) या महिलेस ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्या महिलेस अटक करून तपासयंत्रणा राबविली होती. यावेळी त्या महिलेने राहण्याच्या ठिकाणाबाबत खोटी माहिती दिली होती. दरम्यान, पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन तिच्या पत्त्याबाबत विचारणा केली असता त्या महिलेने अयोध्यानगरी, ई विंग, राधिका रोड, सातारा येथे राहत्या घरी ५० रुपये किमतीच्या नोटा स्कॅन करून लॅपटॉप व कलर प्रिंटर, कटिंग मशीनद्वारे बनावट नोटा तयार करून किरकोळ साहित्य खरेदीसाठी या नोटांचा वापर करीत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सातारा येथील तिच्या घरातून लॅपटॉप, कलर प्रिंटर, पेपर कटिंग मशीन, अकरा पेपर रिम, मोबाईल संच, अठरा हजार रुपये किमतीच्या ५० रुपये दराच्या जुन्या व नवीन पद्धतीच्या बनावट चलनी नोटा व नृसिंहवाडी येथे खपवत असताना ५० रुपये किमतीच्या १२ हजार ९५० रुपयांच्या बनावट नवीन चलनी नोटा असा एकूण ८२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या महिलेबाबत अधिक चौकशी केली असता तिच्यावर सातारा न्यायालयात गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई नवनाथ सुळ, ज्ञानेश्वर सानप, ज्ञानेश्वर काळेल, गजानन कोष्टी, पोलीस कॉन्स्टेबल ताहिर मुल्ला, संदीप हेगडे, अभिजित परब, युवराज खरात, संतोष जाधव, सागर पाटील, प्रियांका कदम, मोनिका खाडे, सहायक फौजदार राजेंद्र इटाज-पुजारी यांच्यासह पथकाने केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी करीत आहेत.
फोटो - ०७१२२०२०-जेएवाय-०८
फोटो ओळ - शिरोळ पोलिसांनी संशयित महिलेच्या सातारा येथील घरातून बनावट नोटासह जप्त केलेला मुद्देमाल.