शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

...अन्यथा ‘भाजप’ ला मत नाही : पेन्शनर, गिरणी कामगारांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:21 IST

कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला.

ठळक मुद्दे: भाजप कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर : कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला. बिंदू चौक येथील भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आमच्या भावना कळवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्याकडे केली.

दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मीपुरी येथील सर्व श्रमिक संघाच्या कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही जिल्ह्याच्या कानाकोपºयातून मोठ्या संख्येने पेन्शनर व गिरणी कामगार कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी झाले होते. ‘नो कोशियारी... नो व्होट’, ‘घर नाही तर मत नाही’ अशा घोषणा देत आंदोलकांचा हा मोर्चा फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा चौक, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौकमार्गे राजाराम रोडवरील भाजप कार्यालयाकडे निघाला. दरम्यान, सबजेल येथे मोर्चाचे रूपांतर ठिय्यात झाले. या ठिकाणी ‘आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भाजपला मत नाही,’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.

या ठिकाणी संदीप देसाई हे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी पंतप्रधान मोदींना पाठविण्यासाठीपेन्शनरांचे व मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यासाठी गिरणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले.अतुल दिघे म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निवडणुकीपूर्वी ९० दिवसांत कोशियारी कमिटी लागू करून प्रश्न मार्गी लावला जाईल, असे सांगितले होते; परंतु साडेचार वर्षे उलटली तरी काहीच निर्णय झालेला नाही. ५८ लाख पेन्शनर या निर्णयावर अवलंबून आहेत. तसेच राज्यातील गिरणी कामगारांनाही अद्याप घरे मिळालेली नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत असे नाही. त्यामुळे त्यांनी गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा जाहीर करावा. यासह पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला मत मिळणार नाही.

संदीप देसाई म्हणाले, पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत श्रमिक संघातर्फे देण्यात आलेले निवेदन हे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविले जाईल. या मागण्यांबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून, शासनपातळीवर त्याचा पाठपुरावा केला जाईल.आंदोलनात दत्तात्रय अत्याळकर, नारायण मिरजकर, अनंत कुलकर्णी, विलास चव्हाण, शांताराम पाटील, अमृत कोकितकर, रामजी देसाई, बाजीराव पाटील, आदींसह गिरणी कामगार व पेन्शनर सहभागी झाले होेते. 

आमच्या वाटणीचे आम्हाला द्यामुंबई ही कामगारांच्या परिश्रमाने सोन्याची बनली; परंतु ती आता बिल्डर लुटायला निघाले आहेत; त्यामुळे यातील आमच्या गिरणी कामगारांच्या वाटणीचे सरकारने द्यावे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही, असे अतुल दिघे यांनी सांगितले.सरकारने निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावापेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा, आम्ही अच्छे दिनच मागायला आलो आहे, असे दिघे यांनी सांगितले. पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी मंगळवारी सर्व श्रमिक संघातर्फे बिंदू चौक येथील भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेन्शनर व गिरणी कामगारांच्या कुटुंबातील महिलांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर