कोल्हापूर : लाँगमार्चच्या दरम्यान राज्य सरकारने लेखी आश्वासन दिले; पण त्यामध्ये गद्दारी केली. अजूनही त्यांनी शहाणपणा दाखवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संपाची पुनरावृत्ती होईल १ जूनपासून शेतकरी संपावर जातील, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला. येत्या महिनाभर संपूर्ण राज्य पिंजून काढणार असून, शेतकरी बापाच्या रणसंग्रामासाठी सज्ज राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
किसान सभेच्यावतीने रविवारी कोल्हापुरात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. बी. पाटील होते. नवले म्हणाले, शेतकºयांच्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आणि मागण्यांबाबत त्यांनी लेखी आश्वासन दिले. किसान सभेच्या ताकदीने सरकार नमले, हे अर्धसत्य असून जात, पात, राजकीय अभिलाषा बाजूला ठेवून शेतकरी लॉँग मार्चमध्ये सहभागी झाला म्हणूनच सरकार नमले; पण सरकारने शेतकºयांशी गद्दारी केली. ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात ४० लाख शेतकºयांना १३ हजार ७०० कोटींची कर्जमाफी झाली. महिलांच्या नावावरील आणि कुटुंबातील एकाचीच कर्जमाफी, अशा जाचक अटी घालून भाजप सरकारने आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून बापाची शिकार केली असून, त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. विविध संघटनांना सोबत घेऊन राज्यातील वीस लाख, तर देशातील दहा कोटी शेतकºयांच्या स्वाक्षरीची मोहीम हातात घेतली आहे. सरकारकडून लूटवापसी होत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. सरकारने गद्दारी करू नये. आश्वासने पाळावीत अन्यथा १ जून २०१७ च्या शेतकरी संपाची पुनरावृत्ती होईल.चंद्रकांत पाटील म्हणजे ‘फायर ब्रिगेड’शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’सारखा वापर केल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी यावेळी केली. ते म्हणाले, आम्हाला वाटले चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.शेतकºयांचे डोळे पाणावलेनवले यांनी तासाभराच्या भाषणात सरकारचे वाभाडे काढत लॉँग मार्च वर्णन अत्यंत भावनिकरीत्या केले. मोर्चातील शेतकºयांच्या वेदनांचे वर्णन ऐकून उपस्थित शेतकºयांचे डोळे पाणावले.दुधाचा सप्ताह अन्मोदी ग्लासदूध दरवाढीसाठी ३ ते ९ मे दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर ‘दूध सप्ताह’ करायचा आहे. रोज एका गावातील दूध आणून ते गरम करून भाजपचे पदाधिकारी, नेत्यांसह अधिकाºयांना वाटायचे. ‘दुधाची लूट थांबवा; अन्यथा शरम नसेल तर फुकट न्या,’ असे आंदोलन करा आणि १ मेच्या गावसभेत तसा ठराव करा. दूध वाटपासाठी उंचीने जास्त पण दूध कमी बसणारे ‘मोदी ग्लास’ वापरा आणि ते गुजरातमधूनच आणा, असा टोलाही नवले यांनी लगावला.