शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
2
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
3
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
4
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
5
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
6
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
7
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
8
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
10
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
11
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
12
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
13
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
14
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
15
इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याची मागणी
16
आणखी एका बँक अधिकाऱ्याची अटल सेतूवरून उडी; पत्नीला शेवटचा मेसेज...
17
बचतीवर व्याज जैसे थे, सर्वसामान्यांना दिलासा
18
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
19
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
20
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  

Maratha Reservation Kolhapur : अन्यथा... लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, कोल्हापुरातील मराठा संघटनांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 7:21 PM

Maratha Reservation Kolhapur : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील विविध मराठा संघटनांनी गुरुवारी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.

ठळक मुद्देकोल्हापुरातील मराठा संघटनांचा इशारा आरक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळी आत्मक्लेश

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील विविध मराठा संघटनांनी गुरुवारी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.या समाधिस्थळी सकाळी सव्वादहाच्या सुमारास विविध मराठा संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. त्यात भगवे स्कार्फ, टोपी घालून आणि भगवे ध्वज हातात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले. मराठा समाज गेल्या ६० वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे; पण राज्यकर्त्यांची आरक्षण देण्याची मानसिकता नाही. इतर समाजाची व्होट बँक सांभाळण्यासाठी ते मराठा समाजाला आरक्षण नाकारत आहेत. ते आता मराठा समाज खपवून घेणार नाही.

कोरोनामुळे आम्ही आज शांततेत आत्मक्लेश आंदोलन केले. यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. आरक्षणाबाबतच्या खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असणार आहे, असे बाळ घाटगे यांनी सांगितले. आंदोलनात चंद्रकांत पाटील, मारूतराव कातवरे, आर. के. पोवार, बाबा महाडिक, संपतराव पाटील, सुनीता पाटील, गीता हासूरकर, यशदा सरनाईक, लता जगताप, छाया जाधव, शारदा पाटील, सुषमा डांगरे, गौरी मोहिते, मीना तिवले, लता सासने, राजू सावंत, रमेश मोरे, सी. एम. गायकवाड, फत्तेसिंह सावंत, दीपक घोडके, जयदीप शेळके, मदन पाटील, उदय लाड, राहुल इंगवले, राजू भोसले, राजेश वरक, अजित दळवी आदी सहभागी झाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर