नितीन भगवानपन्हाळा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही असा आरोप केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली आहे. आमदार गेले म्हणून जनाधार गेला असे होत नाही. असे समजण्याचा गैरसमज ही करू नये. अन्यथा तुम्हाला दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगण्याची वेळ आली नसती. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. पन्हाळ्यावर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जात आहेत असं प्रसार माध्यमामधूनचं मी ऐकलं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकी संदर्भात अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे इंडियामध्ये सहभागी झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांची बाजू भक्कमच आहे, त्यात शंका घेण्याचा काय आहे ? दुसरी बाजू त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच मात्र पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेच्या बाबतीत भाष्य केलं आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी अफेडिव्हिड करून दिलेला आहे. ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. राज्यकर्तेचं जबाबदार नांदेडची घटना अत्यंत गंभीर आहे. औषध खरेदी करण्याचा निर्णय या सरकारमधील मंत्र्यांना घेतला तोच निर्णय या गोष्टीला कारणीभूत आहे. नाहीतर नांदेडची घटना घडलीच नसती. आमच्या सरकारच्या काळात विकेंद्रीत खरेदी करण्याची व्यवस्था होती. मात्र या सरकारच्या काळात संबंधित मंत्रांनी स्वतःकडे अधिकार घेतलेले आहेत. महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेस झालेले नसतील, औषधांचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असेल त्यामुळे मंत्रीच यास जबाबदार असतील, जर मंत्रीच असं म्हणत असतील की मंत्री जबाबदार आहेत तर राज्यकर्ते या गोष्टीला जबाबदार असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.पवारांच्यामुळे आम्हाला नेतृत्व करण्याची संधी शरद पवारांच्या 25 वर्षाच्या नेतृत्वामुळे आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळालेली आहे. गेली 17 ते 18 वर्षे सगळेजण जवळपास हे मंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी शरद पवार साहेबांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही. आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो भारतातील जनता मान्य करेल असं वाटत नाही.नाना पटोले यांच्या यादीवर पक्षश्रेठी विचार करतीलनाना पटोले यांनी दिलेल्या यादीमध्ये एखाद्याचे नाव पुढे मागं होऊ शकते. त्यात विशेष बाब काही नाही. पटोलेंच्या यादीवर पक्षश्रेष्ठी सुद्धा विचार करतील. असे जयंत पाटील म्हणाले.
..अन्यथा दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगायची वेळ आली नसती; जयंत पाटलांचा बावनकुळेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 3:46 PM