जिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:40 PM2019-12-26T19:40:04+5:302019-12-26T19:42:08+5:30

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Our Number 1 in Zilla Parishad: Satej Patil's Claim | जिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा

जिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच : चर्चेतून मार्ग काढणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, गुरुवारी दुपारी कॉँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट संवाद झाला. यावेळी कॉँग्रेससह शिवसेनेनेही अध्यक्षपदाबरोबरच दोन समित्यांचे सभापतिपद मागितल्यामुळे शेवटपर्यंत चढाओढ होण्याची शक्यता आहे.

कॉँग्रेस समितीच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणारा मेळावा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना येण्यास वेळ झाल्यामुळे तब्बल दीड तास लांबला.

मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले,‘ महाविकास आघाडीचे संख्याबळ आता ३७ वर गेले आहे. आणखी तीन सदस्य आमच्याकडे येतील. त्यामुळे ही संख्या ४० वर जाईल. शिवसेनेने अध्यक्षपदासह अन्य दोन समित्यांचे सभापतिपद मागितले आहे. आमचे सर्वाधिक सदस्य असल्यामुळे अध्यक्षपद कॉँग्रेसला मिळावे, असा आम्ही दावा केला आहे. 

 

Web Title: Our Number 1 in Zilla Parishad: Satej Patil's Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.