कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवामध्ये गावागावांतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण करत, आपल्या विविध कलागुणांचे प्रभावी दर्शन उपस्थितांना घडविले.येथील शाहू स्मारक भवनमध्ये बुधवारी झालेल्या या महोत्सवामध्ये गडहिंग्लज, राधानगरी आणि करवीरने अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
सुरुवातीला तालुका पातळीवर स्पर्धा घेऊन त्यातून जिल्ह्यासाठी निवड केली जाते. गेले महिना दोन महिने शिक्षकांनी परिश्रम घेऊन या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतल्याचे हे कार्यक्रम बघताना जाणवत होते. शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांच्या हस्ते आणि अरुण इंगवले, भगवान पाटील, शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.समूहगीत, समूहनृत्य, नाट्यीकरण, कथाकथन आणि प्रश्नमंजूषा अशा पाच प्रकारच्या या स्पर्धा लहान आणि मोठ्या गटांमध्ये घेण्यात आल्या. गोंधळ, वासुदेव गीत, वाघ्या मुरळी, आदिवासी नृत्य अशा महाराष्ट्रातील विविध सामूहिक नृत्यांचा अविष्कार यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यावेळी सर्वांना घडविला.लहान गटामध्ये अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविणाऱ्या शाळा पुढीलप्रमाणे. समूहगीत-कुडुत्री विद्यामंदिर (राधानगरी), कन्या शाळा यड्राव (शिरोळ), सांगवडे विद्यामंदिर (करवीर), समूहनृत्य हसूरचंपू विद्यामंदिर (गडहिंग्लज), यवलूज विद्यामंदिर (पन्हाळा), किणी विद्यामंदिर (हातकणंगले), नाट्यीकरण पळसंबे विद्यामंदिर (गगनबावडा), कुदनूर विद्यामंदिर (चंदगड), फेजिवडे विद्यामंदिर (राधानगरी), कथाकथन उर्दू नेसरी (गडहिंग्लज), दोनवडे विद्यामंदिर (करवीर), नवरसवाडी विद्यामंदिर (भुदरगड), प्रश्नमंजूषा लिंगनूर विद्यामंदिर (गडहिंग्लज), वझरे विद्यामंदिर (आजरा), शिनोळी विद्यामंदिर (चंदगड)मोठ्या गटातील पहिल्या तीन विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे : समूहगीत कुमार चंदूर (हातकणंगले), मांडेदुर्ग विद्यामंदिर (चंदगड), खुपीरे विद्यामंदिर (करवीर), समूहनृत्य, देवरवाडी विद्यामंदिर (चंदगड), हरपवडे विद्यामंदिर (पन्हाळा), मुरूडे विद्यामंदिर (आजरा), नाट्यीकरण केंद्रशाळा फेजिवडे (राधानगरी), भाटिवडे विद्यामंदिर (भुदरगड), उर्दू खिद्रापूर (शिरोळ), कथाकथन शिंगणापूर विद्यामंदिर (करवीर), थेरगाव विद्यामंदिर (शाहूवाडी), चंद्रे विद्यामंदिर (राधानगरी), प्रश्नमंजूषा शेळप विद्यामंदिर (आजरा), लिंगनूर विद्यामंदिर (गडहिंग्लज), मुदाळ विद्यामंदिर (भुदरगड)