कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारांवर कोरोनाचे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. नवे २०४१ रुग्ण असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचीही संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत २२ हजार ९१६ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून २०४१ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरात ४३६, करवीर तालुक्यात ५३५, तर हातकणंगले तालुक्यात २९९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोल्हापूर, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील मृतांचा आकडा कमी येण्याची चिन्हे नाहीत. कोल्हापूर शहरात सात, करवीर तालुक्यात आठ आणि हातकणंगले तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
तालुकावार मृतांची आकडेवारी
करवीर ०८
पाचगाव २, पाडळी खुर्द, कसबा आरळे, गोकुळ शिरगाव, नंदगाव, कसबा बावडा, साळाेखेनगर.
कोल्हापूर ०८
मंगळवार पेठ, राजारामपुरी २, नंगिवली चौक, शिवाजी पेठ, पाटोळेवाडी, आर. के. नगर, ताराबाई पार्क.
हातकणंगले ०५
जुने चावरे, किणी, हुपरी, नवे चावरे, माणगाव.
गडहिंग्लज ०३
अर्जुनवाडी, भडगाव, शिप्पूर तर्फ आजरे.
पन्हाळा ०२
आरळे, पोहाळे.
कागल ०१
लिंगनूर दुमाला.
राधानगरी ०१
आवळी बुद्रुक.
शिरोळ ०१
इचलकरंजी ०१
इतर जिल्हे ०४
बोरगाव, शिवपूरवाडी, ढवळी, रत्नागिरी.