कोल्हापूर : मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक जुन्या, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक इमारती न उतरल्यास आपत्तीजनक परिस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात भिंती कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील सुमारे ११८ धोकादायक इमारती उतरून घेण्याच्या तसेच स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. जुन्या कोल्हापुरात म्हणजेच बिंदू चौक सबजेल परिसर, गंगावेश, महाद्वार रोड (अंबाबाई मंदिर परिसर), शिवाजी रोड, हत्तीमहाल रोड या परिसरात धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे.संततधार पावसामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये धोकादायक इमारती कोसळल्याने अनेकांचे बळी गेले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर शहरात पावसाळ्यापूर्वी सुमारे ११८ धोकादायक इमारत मालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत; पण या नोटिसांना बहुतांश घरमालकांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट दिसते..... अन्यथा २५ हजारांचा दंडमहानगरपालिका अधिनियम १९४९, कलम २६४ (४), २६८(१) नुसार या इमारतीत राहणे धोकादायक असून, त्यांनी इमारत रिकामी करावी. कलम २६५ (अ) नुसार नोटीस मिळाल्यानंतर मालकाने संबंधित धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून इमारत सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे अन्यथा मालकास २५ हजार रुपये दंडाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.मालक, कूळ वादशहरात २१ ठिकाणी अतिधोकादायक इमारती, वाडे असून अनेक इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. अशा इमारतींत कुटुंबे राहत आहेत. मालक व कूळ वाद न्यायालयात असल्याने या इमारती धोकादायक बनून त्यांचा ताबा कुळांकडे आहे.चार-पाच वेळा नोटिसानोटिसा बजावलेल्या अनेक धोकादायक इमारती उतरवून घेण्याबाबत मालकांना प्रशासनाने यापूर्वी चार-पाच वेळा नोटिसा बजावल्या; पण त्याकडे मालकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशा अतिधोकादायक इमारती महापालिका स्वत: उतरवून येणारा खर्च संबंधित मालकांकडून वसूल करणार आहे.
- शहरातील धोकादायक इमारती (विभागीय कार्यालयनिहाय)
- शिवाजी मार्केट - ६०,
- राजारामपुरी कार्यालय- ३६,
- ताराराणी मार्केट- १३,
- गांधी मैदान- ९.
अतिधोकादायक इमारतींना नोटिसा१) सूर्याजी बाबूराव चव्हाण (सी वॉर्ड, महापालिकेनजीक), २) श्रीकांत योगेंद्र सप्रे (रंकाळा वेश), ३) नंदकुमार बापू सूर्यवंशी (महाद्वार रोड), ४) बापू रामचंद्र साळोखे (वांगी बोळ), ५) दत्तात्रय शंकर चिले (डाकवे गल्ली, मंगळवार पेठ), ६) सुरेश दत्तात्रय सांगावकर (२८७२, वांगी बोळ), ७) प्रसाद सुरेश सांगावकर (वांगी बोळ), ८) बसाप्पा कसबेकर (गंगावेश), ९) सुनील मोहन रणदिवे व राजेंद्र माणिक रणदिवे (पापाची तिकटी), १०) कमल कृष्णा निकम (आझाद गल्ली), ११) दामाजी नामजी भालदेव (शिवाजी रोड), १२) अरविंद राजाराम वेल्हाळ (शनिवार पेठ), १३) शबाना अब्दुलरशीद बागवान (गंजी गल्ली), १४) ज्योत्स्ना वासुदेव ठाकूर (लाड चौक, बी वॉर्ड), १५) सुशील एकनाथ जठार (१७०७ बी, मंगळवार पेठ), १६) अप्पासाहेब महादेव साळोखे (बिंदू चौक सबजेलनजीक), १७) अनुराधा अरविंद मस्कर (बुरुड गल्ली), १८) श्रीपाद दत्तात्रय पंडितराव (वांगी बोळ), १९) निकीता प्रसन्न काटवे (तोफखाना, महाद्वार रोड), २०) वसंतराव जामदार (दोन मिळकती), २१) कमल सूर्यवंशी (दोघेही आझाद गल्ली).