गडहिंग्लज : मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या येथील राज ठाकरे कोवीड अलगीकरण आरोग्य मंदिराला नामदार हसन मुश्रीफ फौऊंडेशनकडून २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले.फाउंडेशनचे अध्यक्ष व 'गोकुळ'चे नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.नवीद मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीत ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हाभर फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप केले आहे.यावेळी किरण कदम,सुरेश कोळकी,हारुण सय्यद, उदय परीट,गुंड्या पाटील,महेश सलवादे,रश्मिराज देसाई,संतोष कांबळे,राजू जमादार,दिपक कुराडे,प्रशात शिंदे, तुषार यमगेकर,अमर मांगले,अवधूत रोटे,अक्षय शिंदे,विनायक दोनवडे,आविनाश ताशिलदार,प्रभात साबळे उपस्थित होते. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आभार मानले.