शिये ग्रामपंचायत, ग्राम दक्षता समिती आणि डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने शिये येथे ३२ बेडचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. पण सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सोय नसल्यामुळे रुग्णाला कोल्हापूरला पाठवावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन मनीषा कुरणे यांनी ही पाच कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिली. यामुळे आता शिये कोविड सेंटरमध्ये पाच ऑक्सिजन बेडची सोय झाली आहे.
यावेळी उपसरपंच शिवाजी गाडवे, माजी जि. प. सदस्य बाजीराव पाटील, जयसिंग पाटील, जयसिंग काशिद, सदस्य कृष्णात चौगले, विश्वास पाटील, प्रभाकर काशिद, तेजस्विनी पाटील, पूनम सातपुते यांच्यासह बाबासो बुवा, नीलेश कदम, जयसिंग फडतारे, संदीप पाटील, डॉ. विलास सातपुते, ग्रामविकास अधिकारी रमेश कारंडे, तलाठी युवराज केसरकर, आरोग्य विभागाचे एन. व्ही. कोळी आदी उपस्थित होते.
फोटो : १४ शिये मदत
शिये येथील कोविड सेंटरला जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वीकारताना सरपंच रेखा जाधव व इतर.