शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

corona virus : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 4:19 PM

गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० सिलिंडर क्षमतेचा ऑक्सिजन जनरेटर आणि इचलकरंजी येथील आयजीएममध्ये सहा केएलचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली.

ठळक मुद्देगडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर, आयजीएममध्ये टँक बसविण्यात येणार प्रस्ताव मान्य : जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध औषध, ऑक्सिजन साठ्याचा घेतला आढावा

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० सिलिंडर क्षमतेचा ऑक्सिजन जनरेटर आणि इचलकरंजी येथील आयजीएममध्ये सहा केएलचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली. या सुविधा तत्काळ कार्यान्वित करावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांना दिले.कोव्हिड-१९ रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध असणारा औषध आणि ऑक्सिजन साठा, संभाव्य मागणी, रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट किट, पीपीई किट, ग्लोव्हज, साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा आढावा जिल्हाधिकारी देसाई यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.

रॅपिड ॲन्टीजेन टेस्‍ट किट, पीपीई किट याबाबत मागणी करून साठा करून ठेवावा. आवश्यक असणारी औषधे, रेमिडसिव्हीर इंजेक्शन्स, झिंक, व्हिटॅमिन सी याचादेखील साठा करून ठेवा. आजरा, चंदगड येथील कोविड काळजी केंद्रांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑक्सिजन लाईनचे काम पूर्ण करावे.

सीपीआरमधील दूधगंगा इमारतीमध्ये २०० आणि आयजीएममध्येही १०० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याबाबत आवश्यक मनुष्यबळ आणि साधन सामग्रीबाबत प्रस्ताव द्या. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी स्थानिक स्तरावर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबरोबर करार करून कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. बी. शेळके, डॉ. अनिता सैबन्नावर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते.उद्योगांना १५ टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्यास मुभाजिल्ह्यातील सर्वच ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पुढील पाच दिवस (दि. २९ ऑगस्टपर्यंत) १५ टक्के ऑक्सिजन उद्योगांना, तर ८५ टक्के वैद्यकीय कारणांसाठी पुरवठा करण्यास मुभा द्यावी. त्यानंतर (दि. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत) एकूण उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनपैकी २० टक्के ऑक्सिजन हा औद्योगिक वापरासाठी देण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्यात वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता भासणार नाही, याप्रकारे पुरवठा नियंत्रित करण्याचे निर्देश त्यांी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांना दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर