शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ऑक्सिजन निर्मिती, साठवणूक क्षमता वाढवा :जिल्हाधिकारी रेखावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 7:08 PM

CoronaVirus In Kolhapur : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिल्या.

ठळक मुद्देऑक्सिजन निर्मिती, साठवणूक क्षमता वाढवा :जिल्हाधिकारी रेखावारतिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केल्या सक्त सूचना

कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषा कुंभार तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शहर व ग्रामीण भागांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा व विद्युत मशिनरी सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पूर्ण क्षमतेचे जनरेटर बसवावेत. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करा.

येथील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी तेथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढवा, स्राव तपासणीचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी शासकीय प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता तत्काळ घेऊन कामे गतीने मार्गी लावावीत.सद्य:स्थितीत असणारे आयसीयू बेड, उपलब्ध व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लॅन्ट, जनरेटर सुविधा, ऑनलाईन माहिती भरण्याची वेळेत कार्यवाही करणे, स्राव तपासणी क्षमता, बिलांचे ऑडिट, मृत्यू ऑडिटवर अधिक लक्ष देणे, रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना, रुग्णवाहिका, लसीकरण आदी विषयांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांशी संबंधित कामाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.जादा बिल आकारल्यास रुग्णालयांवर कारवाईरुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे ऑडिट करणाऱ्या पथकांनी बिलांची काटेकोर तपासणी करून रोजच्या रोज अहवाल सादर करावा. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. बिलांचे ऑडिट आणि डेथ ऑडिटवर अधिक लक्ष देण्यात येणार असून रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर