कोल्हापूर : जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. (प्रतिनिधी)पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा.- डॉ. पी. डी. राऊत, विभागप्रमुख--पर्यावरणशास्त्र, शिवाजी विद्यापीठरसायनशास्त्रामध्ये एखादा स्वस्त आणि मस्त पदार्थ नव्याने शोधला की, त्याच्या उपयोगाला काहीच मर्यादा राहत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे प्लास्टिक होय. असाच दुसरा पदार्थ म्हणजे, क्लोरोफ्लुरोकार्बन हा होय. १९३० साली याचा वापर शीतकरण (रेफ्रिजरेशन) करण्यासाठी अमोनियाऐवजी सुरू झाला. आता हा वापर इतका झाला की, पुढे आपले संरक्षण करणारा ओझोनचा स्तर फाटला. १९८० साली हा फाटल्याचे जगभरातील संशोधकांच्या नजरेस आले. मग यूएनईपी एजन्सीनुसार सीएफसी वायू सन २००० पर्यंत कमी करण्याचे ठरले. दरम्यान, १९९५ साली १६ सप्टेंबर हा जगभरात ‘ ओझोन डे’ साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार हा स्तर आणखी फाटू नये, म्हणून प्रयत्न केले जात आहेत.ओझोन स्तराचा रोजच्या जीवनात काय उपयोगथेट सूर्याच्या किरणांमध्ये अतिनील किरणांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराला घातक असलेले पदार्थ या किरणांमधून शरीरात प्रवेश करतात. त्यातून त्वचेचा कर्करोग, त्वचा वृद्ध होणे, मोतीबिंदू होणे, तर जंगले, शेती, गवताळ प्रदेश निस्तेज होईल. यामध्ये होतो ‘सीएफसी’चा वापरइन्सुलेशन आणि पॅकेजिंग, फर्निचर, बेंडिंग, कारच्या सीटस्, पदार्थ ताजे ठेवण्यासाठी वापरात येणारे रेफ्रीजरेटर, आॅटोमोबाईल्स, वातानुकूलित खोल्या, एअरकंडिशनर, इलेक्ट्रिक सर्किट स्वच्छ करण्यासाठी वापरात येणारे द्रव्य पदार्थ.रुग्णालयांमध्ये सुया उकळण्यासाठी वापरात येणारा पदार्थ.आग विझवण्यासाठी वापरात येणारे पदार्थ, आदींमध्ये सीएफसी अर्थात क्लोरोफ्लुरोकार्बनचा वापर वाढला आहे. यातून मुक्त होणारा क्लोरिन हा घटक वातावरणातील ओझोनचा प्रमुख शत्रू आहे.
‘ओझोन डे’ रोजच गरजेचा
By admin | Published: September 15, 2014 9:35 PM