कोल्हापूर : पी. एम. स्वनिधी योजनेअंतर्गत लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशातील फेरीवाल्यांना १० हजारांचा पतपुरवठा केला जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिका प्रथम स्थानी असल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव यांनी दिलीकोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना (पी.एम.स्वनिधी) अंतर्गत पथ विक्रेत्यांना १० हजारापर्यंत पतपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत अंमलबजावणी सुरू केली आहे.
महाराष्ट् राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी बुधवारी या योजनेच्या अंमलबजावणीचा राज्यातील सर्व महानगरपालिकेच्या आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. पी.एम.स्वनिधी योजनेत कोल्हापूर महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये सध्या प्रथम स्थानी असल्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी समाधान व्यक्त केले. आतापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेत १०४४ पथविक्रेत्यांनी अर्ज सादर केले असून २०६ प्रकरणांना बँकेमार्फत मंजुरी मिळाली आहे.
कोल्हापूरसह राज्यात या योजनेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उपायुक्त निखिल मोरे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, ठवछट चे रोहित सोनुले, निवास कोळी, विजय तळेकर उपस्थित होते.