शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

पी. एन. यांच्या व्यूव्हरचनेला भाजपकडून साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर कधी नव्हे ते चिरंजीव राहुल यांच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर कधी नव्हे ते चिरंजीव राहुल यांच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील यांनी टोकाचा आग्रह धरला आणि त्याला पूरक वातावरण निर्मिती करण्याचे काम भाजपने करून टाकले. त्यामुळे सव्वा चार वर्षांपूर्वी पी. एन. यांचे जिवलग मित्र असलेल्या महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आणि शेवटच्या टप्प्यात का असेना पी. एन. यांचे चिरंजीव राहुल हेदेखील अध्यक्ष झाले. भाजपच्या भूमिकेची आणि या योगायोगाची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

चा महिन्यांपूर्वी पदाधिकारी बदलाची चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच पी. एन. यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन अध्यक्षपदाची संधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजीनामे लांबले. ते झाल्यानंतर संकेतानुसार राहुल पाटील जिल्हा बंकेत हसन मुश्रीफ यांना भेटून आपण इच्छुक असल्याचे सांगून आले. त्यानंतरच्या अर्ध्या तासातच मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केली आणि इथेच पी. एन. यांनी राहुल यांना अध्यक्ष करण्याचा चंग बांधला.

त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीकडून युवराज पाटील यांचे नाव निश्चित समजले जात असताना दुसरीकडे पी. एन. यांच्याकडे त्यांना पाठबळ देणाऱ्या सदस्यांची यादी तयार होऊ लागली. शांत असलेल्या भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. धनंजय महाडिक यांनी राजू शेट्टी यांचे घर गाठले. चर्चा केली. भाजपचे १३ सदस्य सहलीवर पाठवण्यात आले.

पावसाळी अधिवेशनादरम्यान मुश्रीफ, सतेज पाटील आणि पी. एन यांची मुंबईत बैठक झालीच होती; परंतु निर्णय झाला नव्हता. कोल्हापुरात आल्यानंतर राहुल यांच्यासाठी ११ सदस्य ठाम असल्याचे गणित मांडण्यात आले. प्रथेनुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सतेज पाटील यांच्याही कानावर पी. एन. यांनी या सर्व गोष्टी घातल्या. अखेर शनिवारी बैठक ठरली आणि याच बैठकीत पी. एन. यांनी अनेक गोष्टी मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्याचे समजते. आतापर्यंत जिल्हा परिषदेचे चार, चार अध्यक्ष मी केलेत. आता माझ्या मुलावेळीच कशा अडचणी येतात, अशी विचारणा त्यांनी केली. बाजार समितीच्या राजकारणापासून सगळ्या बाबींची उजळणी पी. एन. यांनी यावेळी केल्याचे सांगण्यात येते. पी. एन. आणि सतेज पाटील यांनी एकत्र यावे अशीही प्रमुख सदस्यांची इच्छा होती. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे अखेर राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

चौकट

राहुल यांच्या नावानंतर भाजपवाले घरी

पन्हाळ्यावरील रविवारच्या बैठकीत राहुल यांचे नाव निश्चित झाल्यानंतर लगेचच भाजपच्या सदस्यांना घरी जाऊ देण्यात आले. कारण ज्या कारणासाठी दबाव तयार केला जात होता तेच कारण संपले होते. याचाच दुसरा टप्पा म्हणजे एरवी कॉंग्रेसविरोधात शड्डू ठोकणाऱ्या भाजपने राहुल यांचे नाव पुढे येताच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

चौकट

शिंपी यांच्यासाठीचे राजेश पाटील यांचे प्रयत्न सार्थकी

आमदार राजेश पाटील यांनी सुरुवातीपासून जयवंतराव शिंपी यांना पद मिळावे म्हणून न थकता प्रयत्न केले होते. त्याला अखेर यश आले. शिंपी यांच्यावर सदाशिवराव मंडलिक आणि नरसिंगवराव पाटील यांचा शिक्का आहे. त्यांचे चिरंजीव टीम सतेजचे काम करतात. ‘गोकुळ’ च्या उमेदवारीसाठीही आमदार पाटील यांनी प्रयत्न केले होते; परंतु त्यात यश आले नाही. पाटील यांच्याच पुढाकारातून तीन महिन्यांपूर्वी आणि आता गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिंपी यांनी भेट घेतली होती. परिणामी रस्सीखेच असतानाही शिंपी उपाध्यक्ष बनले.

चौकट

भाजपच्या बैठकीला चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

निवडीआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथील एका हॉटेलवर भाजप जनसुराज्यच्या सदस्यांची बैठक झाली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे हेदेखील उपस्थित होते. जनसुराज्यचे शिवाजी मोरे यांचा अध्यक्षपदासाठी तर हेमंत कोलेकर यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचे निश्चित करण्यात आले; परंतु पी. एन. यांच्या फोननंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.

१२०७२०२१ कोल शौमिका महाडिक ०१

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी नूतन अध्यक्ष राहुल पाटील आणि उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे अभिनंदन केले.