शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

पी. एन. यांच्या आग्रहामुळे निवडीमध्ये पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:18 AM

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील हे चिरंजीव राहुल यांच्यासाठी ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील हे चिरंजीव राहुल यांच्यासाठी आग्रही असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातून आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील काय मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल पाटील उमेदवार नसतील तर आम्हाला गृहित धरू नका, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी घेतल्याचा दावा पी. एन. यांच्या गटाकडून केला जात आहे.

सर्वांत आधी तीन महिन्यांपूर्वीच पी. एन. यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राहुल यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेत मुश्रीफ यांची तर ‘अजिंक्यतारा’वर सतेज पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, अर्ध्या तासांतच मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केल्याने युवराज पाटील यांचे नाव चर्चेत आले. सतेज पाटील यांनीही काँग्रेसने अध्यक्षदावरील दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केल्याने आणखी संभ्रम वाढला.

अशातच राहुल पाटील यांनी सदस्यांच्या गाठीभेटी सुरूच ठेवल्या. शुक्रवारच्या बैठकीला पी. एन. शेवटच्या टप्प्यात आले. सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर सर्व नेतेमंडळी मुश्रीफ यांच्या दालनामध्ये गेली. परंतु तेथे फारशी चर्चा झाली नसल्याचे समजते. त्यामुळे तेथून पी. एन. लगेचच बाहेर पडले. चार वर्षांपूर्वीच्या निवडीवेळी गणित न जमल्याने आता मात्र पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी पी. एन. यांच्यावरच दबाव वाढविला आहे. राहुल पाटील यांच्यासाठी कोण कोण वेगळी भूमिका घेऊ शकते अशा काही सदस्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चौकट

पी. एन, राजू शेट्टी यांची भेट

शासकीय विश्रामगृहावरील बैठकीनंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत पी. एन. आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली. राहुल जर अध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर शेट्टी त्यांना पूरक भूमिका घेतील, अशी या बैठकीनंतर चर्चा सुरू झाली.

चौकट

पी.एन., मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात बैठकीची शक्यता

‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे जरी सतेज आणि पी. एन. एकमेकांविरोधात लढले असले तरी सतेज यांनी पी. एन. यांच्यावर एकाही ‘शब्दा’ने टीका केली नाही. त्यामुळेच राहुल यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी पी. एन. यांनी शुक्रवारी सायंकाळी सतेज यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी किंवा अगदीच शक्य झाले नाही तर पन्हाळ्यावर रविवारी मुश्रीफ, सतेज पाटील आणि पी. एन. यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.