महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर) यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील इ. ५ वीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांना घडवणारे शिक्षक, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांचा पी. एन. पाटील फौंडेशनच्यावतीने गुणगौरव समारंभ आयोजित केला असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष ए. डी. चौगले यांनी हळदी (ता. करवीर) येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार, दि. ४ रोजी निवृत्ती संघ, फुलेवाडी येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा तसेच जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. के. शानेदिवान, तर सत्कार आमदार पी. एन. पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस धनाजी पाटील, जे. डी. कांबळे, निवास कुंभार यांच्यासह फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
पी. एन. पाटील फौडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:25 AM