कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेच्या आज, बुधवारी वारणानगर (ता. पन्हाळा) येथे होणाऱ्या ‘शेतकरी-कष्टकरी’ परिषदेत अडचणीतील साखर उद्योगासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीतरी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री येणार आहेत. राज्याचा सरासरी साखर उतारा, द्यावी लागणारी एफआरपी, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि प्रत्यक्ष उपलब्ध होणारी रक्कम पाहता किमान प्रतिटन ६०० रुपये शॉर्ट मार्जिन आहे. आगामी हंगामात राज्याचे गाळप १0 कोटी टन झाले, तर पाच ते सहा हजार कोटींचे शॉर्ट मार्जिन राहणार आहे. ही सगळी माहिती राज्यमंत्री खोत यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याने ते परिषदेत घोषणा करण्याची शक्यता आहे.कोडोली ऊस परिषद तयारीचा आढावाकोडोली येथे आज, बुधवारी होणाºया ऊस परिषदेच्या तयारीचा आढावा जिल्हा पोलीसप्रमुख आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून घेण्यात आला. सायंकाळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, आमदार सुरेश हाळवणकर, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील, आदी नेत्यांनी कार्यक्रमस्थळी पाहणी केली.
‘पॅकेज’ची घोषणा शक्य;मुख्यमंत्री आज वारणानगरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:46 AM