जिल्ह्यातील २३८ लसीकरण केंद्रांपैकी केवळ १०० हून अधिक लसीकरण केंद्रांवरच मंगळवारी लसीकरण झाले. गुढीपाडव्याच्या सणामुळे नागरिकांनी लसीकरणाला जाण्यापेक्षा घरातच थांबणे पसंद केल्याचे आकडेवारीवरून दिसते.
गेल्या आठवड्यामध्ये लसीकरण खंडित होण्याआधी दिवसाला सरासरी ३५ हजारांहून अधिक नागरिकांनी लसीकरण करून घेतले होते. रविवारी तर हा आकडा उच्चांकी म्हणजे ४३ हजारांवर गेला होता. मात्र, मंगळवारी ११ हजार ८०० नागरिकांनी पहिला तर केवळ १४६९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला.
चौकट
मंगळवारचे लसीकरण
विभाग पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ७७ १०८
फ्रंटलाईन वर्कर ३८४ २११
४५ वर्षांवरील नागरिक ७२४० ३८६
६० वर्षांवरील ४०९९ १४६९
एकूण दिवसभरातील १२२६९
चौकट
एकूण पहिला डाेस घेतलेले नागरिक ६ लाख ८ हजार ८२३
दुसरा डोस घेतलेले नागरिक ३९ हजार ५५६