शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

आंदोलकांचा रस्त्यावर पाडवा

By admin | Published: March 22, 2015 12:39 AM

अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन सुरु : संवेदनशील मनाला स्पर्श; उद्या वनविभागावर मोर्चा

कोल्हापूर : दुसऱ्यांच्या सुखासाठी आपल्या जमिनी देऊन हक्काच्या पुनर्वसनासाठी आंदोलन कराव्या लागणाऱ्या चांदोली अभयारण्यग्रस्तांना शनिवारी गुढीपाडवाही रस्त्यावरच करावा लागला. सर्वजण आपल्या घरात कुटुंबीयांसमवेत हा सण साजरा करीत असताना आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पाडवा या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या संवेदनशील मनाला स्पर्श करणारा होता. आपल्या हक्काच्या मागणीसाठी त्यांची ही जिद्द वाखाणण्यासारखी आहे. सोमवारी (दि.२३) वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. सहाव्या दिवशीही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होेते. चांदोली अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्या, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सोमवारपासून बेमुद ठिय्या आंदोलन सुरूआहे. ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी आंदोलन सुरू असलेल्या मंडपासमोरच गुढी उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी झालेल्या निर्णयामध्ये सोमवारी ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्यालयावर १२ वाजता मोर्चा काढून जाब विचारण्यात येणार आहे. जमिनीच्या निर्वणीकरणाचा प्रस्ताव फक्त मंजुरीसाठी व वारणेच्या लाभक्षेत्रातील जमिनी संपादनासाठी लागणारे पैसे व नागरी सुविधांसाठी लागणारे पैसे, बुडीत झालेल्या गावांच्या ताळीचे व घराचे, जमिनींचे पैसे मिळण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने मंत्रालयात जाऊन स्वत: बसून गुरुवार (दि.२६)पर्यंत बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शुक्रवारी (दि.२७) चांदोली अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व शिराळा तालुक्यातील खानेलपूर या दोन्ही फाटकावरून एकाही पर्यटकाला आत जाऊ दिले जाणार नाही. त्याचबरोबर जंगल व जंगली प्राण्यांचे प्रमाण वाढले पाहिजे म्हणून अभयारण्यग्रस्तांना तेथून हलविण्यात आले; परंतु तेथे आता जंगल व प्राणी वाढले का? गवा आणि इतर प्राणी जंगलात चांगले खाद्य मिळत नाही म्हणून का बाहेर येतात? याचा जाब शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाला ३१ मार्चला सकाळी ११ वाजता मोर्चा काढून विचारणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके यांच्यासह आंदोलक उपस्थित होते. (प्रतिनिधी)